Raj Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

#कलमहाराष्ट्राचा : राज्यात 'मनसे'सह 'वंचित'चा देखील टक्का वाढला

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) दोन वर्ष पूर्ण होत आहेत.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) दोन वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त 'सकाळ आणि साम'नं (Sakal Saam Survey) मिळून एक सर्व्हे केलाय आणि यातील निकाल चकीत करणारे आहेत. राज्यात महाविकास आघाडी कायम सत्तेत राहायची असेल, तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही, त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला काँग्रेसला सोबत घ्यावेच लागेल, असा महाराष्ट्राचा आजचा कौल आहे. सर्व्हेक्षणात ३९.८ टक्के लोकांना काँग्रेससह महाविकास आघाडी असेल, तरच आघाडीला मतदान करायचं आहे.

'सकाळ आणि साम'च्या सर्व्हेक्षणात राज्यात 'मनसे'सह (MNS) वंचितचा (Vanchit Aghadi) देखील टक्का वाढताना दिसतोय. मनसेला 2.9 आणि वंचितला 2.5 टक्के लोकांनी सत्तेत येण्यासाठी पसंती दर्शवलीय. महाविकास आघाडी विरूद्ध भाजप अशी लढत झाल्यास भाजपलाच मतदान करू, असे सांगणाऱ्यांचं प्रमाण 27.5 टक्के आहे. म्हणजे, भाजपच्या मतदानात फारशी घट होईल, असं चित्र नाही. काँग्रेसला वगळलं, तर महाविकास आघाडी सत्तेवर येण्याची चिन्हे नाहीत. कारण, राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीला केवळ 19.8 टक्के कौल आहे. हा महाराष्ट्रातील मतदारांची मानसिकता सांगणारा कौल वाटतो. 'सकाळ आणि साम'च्या सर्व्हेक्षणात भाजप 27.5, शिवसेना 24, राष्ट्रवादी 21.4, काँग्रेस 14.2, मनसे 2.9, वंचित 2.5 आणि इतर 7.1 टक्के लोकांनी या पक्षांना पसंती दर्शवलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रत्येक पाचव्या मिनिटाला एकाचा मृत्यू, सर्वाधिक आत्महत्या, हत्या, अपघाती मृत्यू महाराष्ट्रात; धक्कादायक अहवाल समोर

Drishti satellite : भारताचा पहिला खासगी SAR उपग्रह दृष्टि! अंतराळात फिरतोय की कोसळला? GalaxEye संस्थापकांनी दिलं उत्तर

Mumbai: नामुष्कीनंतर महायुती सावध, ‘त्या’ प्रस्तावाला सभागृहाची अखेर मंजुरी

Latest Marathi News Live Update : निदा खान प्रकरणावरून शिवसेना आक्रमक; इम्तियाज जलील आणि मतीन पटेलवर कारवाईची मागणी

Tamil Nadu Government Formation बहुमताचा आकडा जुळेना, सत्तेचा पेच सुटेना, तामिळनाडुत राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली

SCROLL FOR NEXT