महाराष्ट्र बातम्या

"सकाळ'ची लेखमाला ठरली ऑनलाइन शिक्षणाला निमित्त 

संतोष सिरसट

सोलापूर ः मागील चार वर्षांपूर्वी "सकाळ'ने "माझी शाळा, गुणवत्तापूर्ण शाळा' ही जिल्हा परिषदेच्या शाळांची वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्या वृत्तमालेची दखल राज्यभर घेण्यात आली. सोलापुरातील प्रिसिजन कंपनीच्यावतीने या मालिकेमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना ई-लर्निंग किट दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन शिक्षणाच्या काळात ऑनलाइन तंत्रज्ञान हाताळणे सोपे झाले आहे. 

"सकाळ'च्या उपक्रमात सर फाउंडेशनचे नेटवर्क सोबत होते. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळांच्या माध्यमातून पुढे सोलापूरचा ई-लर्निंग पॅटर्न जन्मास आला. आज गेल्या तीन वर्षांत हा ई-लर्निंग प्रकल्प रुजला, रुळला आणि बहरलाही. चार टप्प्यांच्या माध्यमातून 150 हून अधिक ई-लर्निंग क्‍लास तयार झाले. या शाळातील ई-लर्निंग किटमध्ये काळानुसार तंत्रज्ञान बदलत गेले. त्या बदलानुसार साहित्यही दिले. नुसतेच साहित्य देऊन न थांबता वेळोवेळी शिक्षकांना प्रशिक्षण देऊन अपडेट आणि अपग्रेड ठेवले. कोरोनाच्या महाभयंकर विळख्यात सगळे जग अडकले आहे. त्यात शिक्षण क्षेत्रदेखील खूप मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. अनेकांच्या मनात हे शैक्षणिक वर्ष आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य कसे असेल? यासंदर्भात प्रश्‍न पडलेला आहे. पण या ई-लर्निंग प्रकल्पामुळे मुलांचा संगणक हाताळण्याचा सराव झाला. तंत्रज्ञान त्यांना बऱ्यापैकी अवगत झाले. त्याचा आता फायदा होत आहे. ई-लर्निंग, ऑनलाइन शाळा, इंटरॅक्‍टिव्ह लर्निंग, ऑनलाइन टेस्ट, व्हर्च्युअल फील्ड ट्रीप, व्हर्च्युअल क्‍लास, झूम मीटिंग, फेसबुक लाइव्ह, ट्रेनिंग फ्रॉम होम, लर्निंग फ्रॉम होम, यूट्यूबसाठी व्हिडिओ निर्मिती या इतरांना नवख्या वाटणाऱ्या शिक्षणातील संकल्पना येथील विद्यार्थी, शिक्षक व शाळा यांना मात्र अगदीच परिचयाच्या झाल्या आहेत. अगदी सराईतपणे या सगळ्या गोष्टी शाळांमध्ये राबविण्यात येतात. त्यामुळे तुलनेत येथील शाळांमधील मुलांची शालेय प्रगती या काळातही निरंतर चालूच आहे. यापुढेही नवनवीन गोष्टी करण्याची व शिकण्याची सकारात्मक मानसिकता या शाळांमध्ये, शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये तयार झाली आहे. भविष्यातील शिक्षणात येणारे न्यू नॉर्मल आजच हे सर्वजण जाणून आहेत. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT