solapur

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

बनावट दारु विक्री! देशी-विदेशी दारू, हातभट्टी अन्‌ विविध विदेशी ब्रॅंडची बनावट टोपणे जप्त; सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर, कुर्डुवाडी पथकांसह भरारी पथकाने गोपाळपूर (ता. पंढरपूर), इंदापूर (ता. बार्शी) येथे विदेशी मद्याची वाहतूक करणारी वाहने पकडली. या कारवाईत एकूण १६ लाख ५१ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात बनावट टोपणे देखील आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर, कुर्डुवाडी पथकांसह भरारी पथकाने गोपाळपूर (ता. पंढरपूर), इंदापूर (ता. बार्शी) येथे विदेशी मद्याची वाहतूक करणारी वाहने पकडली. याशिवाय धाराशिव, वैराग पोलिसांच्या मदतीने भरारी पथकाने भातंबरे (ता. बार्शी) येथील हातभट्ट्यांवर कारवाई केली. या कारवाईत एकूण १६ लाख ५१ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात बनावट टोपणे देखील आहेत.

३१ डिसेंबरच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथकांकडून अवैध दारू निर्मिती, वाहतूक, विक्री व साठ्यांवर कारवाई सुरु आहे. गुरुवारी पंढरपूरच्या पथकाने गोपाळपूरजवळ गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या साडेसातशे मिलीच्या ३७ बाटल्या आणि विदेशी मद्याची २५० टोपणे वाहतूक करणारी कार पकडली. दुसरीकडे कुर्डुवाडीच्या पथकाने बार्शीजवळील इंदापूर परिसरातून विदेशी मद्यांची टोपणे व अन्य मुद्देमाल जप्त केला.

तसेच भातंबरे परिसरातील हातभट्ट्यांवर कारवाई करण्यात आली. त्यावेळी १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावेळी २४ हजार १८० लिटर गुळमिश्रित रसायन, ६८० लिटर हातभट्टी, ३९ लिटर विदेशी व २८ लिटर देशी, असा एकूण साडेसोळा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव, प्रभारी उपअधीक्षक जे. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विविध विदेशी ब्रॅंडची नुसती टोपणे देखील यावेळी मिळाले आहेत. बनावट दारुच्या बाटल्यांना ती टोपणे बसवून दारु विक्री केली जात असल्याचा संशय आहे. त्यानुसार आता तपास सुरु आहे.

ढाब्यांवर मद्यपान करणाऱ्यांवर गुन्हे

ढाबे किंवा हॉटेलवर विनापरवाना बेकायदा मद्यपान करणाऱ्यांसह मद्यपानाची सोय करणाऱ्या ढाबा मालकावर देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूरच्या पथकाने कारवाई केली. त्यानुसार चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दारूबंदी न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले होते. परमीट रुमशिवाय अन्य कोणत्याही ठिकाणी परवानगीशिवाय मद्यपानाची सोय करता येत नाही. तरीदेखील, ढाब्यांवर तशी सोय करून दिली जाते. अशा ढाबे, हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून लक्ष ठेवले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mastani Lake Water Shortage : ऐतिहासिक मस्तानी तलावात यंदा निम्माच पाणीसाठा; कमी पावसामुळे वडकीवर टंचाईचे संकट, वन्यजीवांचे स्थलांतर वाढणार

IND vs PAK Final: वैभव-श्रेयस स्वस्तात परतले, पण अभिषेक-तिलकने डाव सावरला! शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस; भारताची गाडी २०० पार

Mula Dam Wate : मुळा धरणाचे सर्व अकरा दरवाजे उघडले; नदीपात्रात २,५०० क्यूसेकने पाणी सोडले

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

Harnai Palande Beach Seagull : दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यावर परदेशी पाहुण्यांचं आगमन! हर्णै-पाळंदेमध्ये झळकले 'सीगल' पक्षी, युरोपमधील वाढत्या तापमानाचा परिणाम?

SCROLL FOR NEXT