Salim Kutta Death Fact Check Esakal
महाराष्ट्र बातम्या

Salim Kutta Death Fact Check: उबाठा आमदार दावा करतात त्याप्रमाणे सलीम कुत्ता खरंच मेलाय का? काय घडलंय नेमकं

सलीम कुत्ता हा जिवंत आहे की मृत याबाबतच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असणारा सलीम कुत्ता याची अधिवेशासह राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सलीम कुत्ताच्या एका पार्टीत ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर सहभागी असल्याचा आरोप झाला आहे. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. (Latest Marathi News)

दरम्यान सलीम कुत्ता हा जिवंत आहे की मृत याबाबतच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. 1998 मध्ये सलीम कुत्ताची रुग्णालयात हत्या झाल्याचा दावा आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. तर ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी देखील कुत्ताचा मृत्यू झाला असल्याचं म्हटलं आहे.

सलीम कुत्ता जिवंत की मृत?

मिडीया रिपोर्टनुसार पोलिसांच्या मते आमदार कैलास गोरंट्याल यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे. 1998 मध्ये जो व्यक्ती मारला गेला होता, त्याचं नाव सलीम कुर्ला असं होतं. सलीम कुर्ला हा मुंबई बॉम्बब्लॉस्टचा आरोपी होता. सलीम कुर्ला हा एजंट म्हणून काम करत होता.

तो खोटे पासपोर्ट बनवायचा. बॉम्बस्फोटातील आरोपीचे पासपोर्ट सलीम कुर्ला याने तयार केले होते. 1998 मध्ये त्याला छोटा राजनच्या गँगने मारले होते. सलीम कुत्ता जिवंत आहे. सध्या तो येरवाडा जेलमध्ये आहे. 1998 मध्ये सलीम कुर्ला याला मारलं होतं.(Latest Marathi News)

सलीम कुत्ता हा 2016 पासून पुण्यातील येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये आहे. त्याआधी तो नाशिक कारागृहात होता. तिथून तो पॅरोलवर सुटला होता. डान्स करत असतानाचा व्हिडीओ तो नाशिक कारागृहातून पॅरोलवर सुटला असतानाचा आहे, याबबातचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

गृहमंत्र्यांनी या सलीम कुत्ता प्रकरणी सविस्तर खुलासा करावा- कैलास गोरंट्याल

मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य आरोपी आणि दाऊद इब्राहिमचा राइट हॅण्ड समजला जाणारा सलिम कुत्ता याची १९९८मध्ये रुग्णालयातच हत्या झाली होती. पण, आमदार नितेश राणे या सलीम कुत्तावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत आहे. गृहमंत्र्यांनी या सलीम कुत्ता प्रकरणी सविस्तर खुलासा करावा, अशी मागणी आमदार कैलास गोरंट्याला यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.(Latest Marathi News)

सलीम कुत्ता याला मारणारे रोहित वर्मा, बाळू ठाकरे, संतोष शेट्टी हे लोक आहेत. त्याला तीन बायका होत्या. टाडा कोर्टात त्याच्या तीनही बायकांनी आमचा पती सलीम कुत्ता मेला असून आमची संपत्ती परत करा, अशी विनंती केली होती. त्यानुसार, न्यायालयाने जप्त केलेली संपती सलीम कुत्ताच्या कुटुंबीयांना परत केली होती. परंतु, आमदार नितेश राणे यांनी सलीम कुत्तासाठी आयोजित पार्टीचा फोटो दाखविला आहे. तसेच हा सलीम कुत्ता १९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असल्याचा दावा करताहेत, तो नेमका कोण, याचा खुलासा गृहमंत्र्यांनी करावा, असे आमदार गोरंट्याल म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT