Uddhav Thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

Samana : "भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट होईल, पुढच्या पिढीला कळणारसुद्धा नाही"

दत्ता लवांडे

मुंबई : आज शिवसेनेच्या दोन्ही गटाची तोफ मुंबईत कडाडणार आहे. दसरा मेळाव्यानिमित्त एकनाथ शिंदे गट आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा वेगवेगळ्या मैदानावर होणार आहे. शिवतीर्थावर आणि बीकेसीवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून आलेल्या शिवसैनिकांनी मुंबई दुमदुमली आहे. तर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजप आणि शिंदे गटावर तोफा डागण्यात आल्या आहेत.

(Shivsena dasara Melava Latest Updates)

"बहुमतातले सरकार धमक्या आणि पैसे देऊन पाडणे हे पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडण्याइतके सोपे असल्याचं काहींना वाटतं. महाराष्ट्राला नष्ट करण्यासाठी राज्याच नवे सरकार निर्माण झाले आहे. बावणकुळे यांनीही योग्य वेळ आली की वेगळा विदर्भ करण्याची घोषणा केली पण महाराष्ट्राची अखंडता आणि नाळ तोडायची असेल तर शिवसेनेची वज्रमुठ तोडावी लागेल आणि भाजपला ते शक्य नाही" अशा शब्दांत सामनातून दंड थोपटण्यात आले आहेत.

"आज शिवतीर्थावर विचारांचे सीमोल्लंघन होईल. कोणी कितीही अपशकुन करू द्या, महाराष्ट्रात शिवसेनेचाच भगवा फडकत राहील. आज मुंबईवर शिवसेनेचे राज्य आहे. तुमच्या छाताडावर बसून पुन्हा मुंबई जिंकूच. पुढील निवडणुकीत कमळाबाईंची अशी जिरणार आहे की, भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल. पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की, भाजप नावाचा एक पक्ष महाराष्ट्रात होता व तो महाराष्ट्राच्या मुळावर आला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सच्चा शिवसैनिक चालत, धावत, मिळेल त्या वाहनाने शिवतीर्थाकडे निघाला आहे. रणमैदान सज्ज होत आहे. ‘खोके’वाल्यांचा अधर्म या निष्ठेपुढे कसा टिकेल? जेथे धर्म तेथे जय! शिवतीर्थाच्या रणमैदानावर धर्म आहे! त्यामुळे जय नक्की आहे!" अशा प्रकारे शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Giorgia Meloni wishes PM Modi: मोदींना इटलीच्या पंतप्रधान मेलोनींकडून 'सेल्फी'वाल्या मेसेजद्वारे खास शुभेच्छा, म्हणाल्या...

Asia Cup 2025: पाकिस्तान संघाचा UAE विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार? खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश; जाणून घ्या प्रकरण

Latest Marathi News Updates : पाकिस्तानने आशिया कपवर बहिष्काराचा निर्णय बदलला? खेळाडूंनी सोडलं हॉटेल

Jalgaon News : जळगाव विमानसेवा ठप्प: अहमदाबाद विमान दीड महिन्यापासून बंद, प्रवाशांची गैरसोय!

Facial Surgery Success Story: "सुसाईड डिसीज"वर यशस्वी शस्त्रक्रिया - ठाण्यात दोन रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

SCROLL FOR NEXT