cash

 
sakal
महाराष्ट्र बातम्या

समर्थ बॅंकेकडून विमा संरक्षणप्राप्त ठेवींसाठी अर्ज घेण्यास सुरवात! बॅंकेच्या सर्व शाखांमध्ये अर्ज, अर्जासोबत लागणार ‘ही’ कागदपत्रे; जानेवारीत मिळणार ठेवी...

५ लाखापर्यंतच्या विमा संरक्षण ठेवी देण्यासाठी डीआयसीजीसीने अर्ज स्वीकारण्याच्या सूचना दिल्यानंतर शुक्रवारपासून बॅंकेने अर्ज स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. सोलापुरातील ८ शाखांसह इतर शहरातील शाखांमध्ये विमा संरक्षण ठेवीसाठी अर्ज उपलब्ध करण्यात आले आहे. बॅंकेत दीड लाख ठेवीदारांच्या ६७० कोटी रूपयांच्या ठेवी आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : समर्थ सहकारी बॅंकेतील ५ लाखांच्या आतील ठेवी देण्यासाठी अर्ज वाटपास शुक्रवारपासून सुरूवात करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी १ नंतर सर्वच शाखांमध्ये अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. दिवाळीसाठी तातडीची व वैद्यकीय कारणास रक्कम काढण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने अद्याप परवानगी दिली नाही, आम्ही रिझर्व्ह बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी सांगितले.

५ लाखापर्यंतच्या विमा संरक्षण ठेवी देण्यासाठी डीआयसीजीसीने अर्ज स्वीकारण्याच्या सूचना दिल्यानंतर शुक्रवारपासून बॅंकेने अर्ज स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. सोलापुरातील ८ शाखांसह इतर शहरातील शाखांमध्ये विमा संरक्षण ठेवीसाठी अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. बॅंकेत दीड लाख ठेवीदारांच्या ६७० कोटी रूपयांच्या ठेवी आहेत. ज्या ठेवीदारांच्या ठेवी आहेत, त्यांना ५ लाख रूपयापर्यंतची रक्कम मिळण्यासाठी अर्जासोबत बॅंक खाते क्रमांक, आधार कार्ड, ठेवी पावतीसह इतर १२ प्रकारची कागदपत्रे जोडून अर्ज द्यावा लागणार आहे. ही सर्व माहिती बॅंकेकडून डीआयसीजीसीच्या पोर्टलवर भरण्यात येणार आहे. सर्व ठेवीदारांची माहिती २१ नोव्हेंबरपर्यंत भरण्याचे आदेश आहेत.

जानेवारीत मिळणार ठेवी...

ठेवीदारांकडून ५ लाख रूपयापर्यंतची रक्कम मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर सर्व माहिती बॅंकेकडून पोर्टलवर भरली जाईल. त्यानंतर ही माहितीची पडताळणी करून संबंधित ठेवीदाराच्या खात्यावर रक्कम जमा होण्यासाठी जानेवारी महिना उजाडणार आहे. विमा संरक्षण असलेल्या ठेवीच्या रकमा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळतील, असे बॅंकेकडून सांगण्यात आले.

पगारी खाते असलेल्या कामगारांना रकमा मिळतील

आम्ही रिझर्व्ह बॅंकेच्या संपर्कात आहोत. तातडीच्या रकमा व वैद्यकीय कारणासाठी रकमा मिळण्यास परवानगी मिळेल, अशी आशा आहे. रिझर्व्ह बॅंकेचे वरिष्ठ अधिकारीही सकारात्मक आहेत. परवानगी मिळताच तातडीने पगार खाते असलेल्या सर्व कामगारांना रकमा देण्यात येतील.

- दिलीप अत्रे, अध्यक्ष समर्थ बॅंक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT