samarth ramdas idol stolen from ram temple birthplace of samarth ramdasat at jamba  
महाराष्ट्र बातम्या

समर्थ रामदासांच्या जन्मगावातील राम मंदिरात चोरी! पंचधातूंच्या मूर्ती लांबवल्या

सकाळ डिजिटल टीम

जालना : येथे समर्थ रामदास यांच्या जन्मगावातील राममंदीरातील ऐतिहासीक मूर्ती आज पहाटे चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. जवळपास ४५० वर्ष जून्या असलेल्या या पंचधातूच्या मूर्ती चोरीला गेल्याने परिसरात एकच खळबळ माजली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. समर्थ रामदासांनी स्थापित केलेली राम-लक्ष्मण-सीतेची मूर्ती तसेच ऐतिहासिक पंचायतन देखील चोरीला गेले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार समर्थांच्या वडिलोपार्जित तसेच समर्थानी स्थापित केलेल्या मुर्त्या देखील या मंदिरात होत्या त्या चोरीला गेल्या आहेत. पंचायतन म्हणजेच राम-लक्ष्मण, सीता, भरत, शत्रूघ्न यांची मूर्ती देखील चोरीला गेली आहे. अज्ञात चोरट्याने मंदिराची चावी घेऊन या दरवाजा उघडून ही चोरी केली आहे. त्यामुळे चोर जवळपासचाच कुणी आहे का याचा पोलिस शोध घेत आहेत. या तपासात श्वानांची देखील मदत घेण्यात येत आहे.

हे मंदिर जालना जिल्ह्यातील समर्थांच्या जन्मगाव जांब येथील आहे. येथे असलेल्या जून्या राममंदिरात असलेल्या ४५० वर्ष जून्या मूर्ती चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी येत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

SCROLL FOR NEXT