संभाजी भिडे e sakal
महाराष्ट्र बातम्या

हिंदूस्थान म्हणजे निर्लज्ज लोकांचा देश, संभाजी भिडेंचा तोल ढासळला

सकाळ डिजिटल टीम

सांगली : संभाजी भिडे (sambhaji bhide) हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा देशाबद्दल बोलताना त्यांचा तोल ढासळला आहे. ''आपण निर्लज्जपणात पहिल्या क्रमांकावर आहे. जगाच्या पाठीवर 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात पारतंत्र्य, परदास्या, परवशता, गुलामी आणि दास्याच्या नरकात राहण्याचा बेशरमपणा आहे. बेशरम लोकांचा, एक अब्ज २३ कोटी लोकांचा देश जगात आहे. हा निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदूस्थान आहे'', असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं. सध्या त्याचा एक व्हिडिओ समोर आला असून ते सांगलीत दुर्गामाता दौडच्या समारोप प्रसंगी बोलत होते.

आपल्या देशाची लोकसंख्या हे जगात क्रमांक दोनवर आहे. पण, आपल्या देशाने निर्लज्जपणात पहिला क्रमांक प्राप्त केला आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे. देशात देशभक्तीचा, स्वातंत्र्याचा, भक्तीचा, आपण कोण आहोत? याची जाणीव नाही. आपला-परका कोण मित्र कोण हे कळत नाही. या देशात कसले सरकार आहे. हा देश जगाचा बाप बनवा. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोहीम हाती घेतली होती. ती मोहीम पार पाडण्यासाठी आपण मोहीम करतो. मागच्या वर्षी आपल्या या कर्तृत्वसंपन्न शासनाने महाराष्ट्रात कोरोना वाढतो. कोरोना येतो, हा थोतांड आहे. कोरोना हा काल्पनिक आहे. कोरोना हा मानवाला न होणारा रोग आहे. कोरोना हा थोतांड आहे. चीनने तुम्हाला आणि आम्हाला पालथं पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे, असेही भिडे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arnab Cyclone Maharashtra : अर्णब चक्रीवादळाचा महाराष्ट्राला तडाखा?; महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पावसाचा इशारा; २८ ते २९ ऑक्टोबर महत्त्वाचे

Uttarakhand Tourism: सीमावर्ती भागांत रस्ते, हवाई कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पर्यटनातून रोजगारनिर्मितीवर धामी सरकारचा भर

Gokul Chairman Election : 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट! सहलीवरून संचालक येणार थेट कोल्हापुरात; फडणवीसांच्या सल्ल्याने महायुती खेळणार मोठा डाव?

Forest Conservation :कर्जतच्या जंगलातील वृक्षतोड थांबली ;स्थानिक ग्रामस्थ,; पर्यावरणप्रेमींसह राजकीय पक्षांचे पाठबळ

Gokul Milk Record : कोजागरीला 'गोकुळ'ची विक्रमी 21 लाख 70 हजार लिटर दूध विक्री; मागील वर्षीच्या तुलनेत विक्रीत किती टक्क्यांची वाढ?

SCROLL FOR NEXT