Sambhaji Bhide esakal
महाराष्ट्र बातम्या

संभाजी भिडे चक्कर येऊन सायकलवरुन पडले, खुब्याला लागला मुका मार

सकाळ डिजिटल टीम

संभाजी भिडे सांगलीतील गणपती मंदिरात दर्शनासाठी नियमित जात असतात.

सांगली : आपल्या सडेतोड वक्तव्यांमुळं नेहमी चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे गुरुजी (Sambhaji Bhide) यांना चक्कर आल्यानं सायकलवरुन पडल्याची माहिती मिळत आहे. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना कमरेखाली खुब्याला मार लागला आहे.

दरम्यान, संभाजी भिडेंना भारती रुग्णालयात (Bharti Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचंही कळतंय. संभाजी भिडे सांगलीतील (Sangli) गणपती मंदिरात दर्शनासाठी नियमित जात असतात. आजही ते दर्शनासाठी सायकलवरुन जात होते. त्यावेळी गणपती पेठ परिसरात त्यांना चक्कर आल्यानं ते जमिनीवर कोसळले. हा प्रकार आजूबाजूच्या लोकांना लगेच लक्षात आला. त्यांनी भिडे यांना तत्काळ उचलून बाजूला बसवलं. काही वेळात भिडे गुरुजी हे शुद्धीवर आले. मात्र, या घटनेत त्यांच्या खुब्याला मुक्का मार लागला आहे.

देशाला गांधीवादी विचारांची बाधा झालीय : संभाजी भिडे

'देशाला म्लेंच्छ, आंग्लवादी आणि गांधीवादी विचारांची बाधा झालीय. त्यावर छत्रपती हा एकच उपाय आहे. देश उभारायचा असेल तर १२३ कोटी जनतेचा रक्तगट बदलायला हवा,' असं वक्तव्य 'शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान'चे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज (Miraj) इथं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT