sambhaji bhide on mahatma gandhi Case registered in Amravati Congress agitation  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sambhaji Bhide on Mahatma Gandhi : महात्मा गांधींविरोधात वादग्रस्त विधान भोवलं! संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल

रोहित कणसे

सतत त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे संभाजी भिडे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. महात्मा गांधींबाबत केलेल्या विधान केल्याने विधानामुळे सध्या वाद पेटला असून संभाजी भिडेंविरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. यादरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल संभाजी भिडे यांच्याविरोधात अमरावती येथील राजापेठ पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभाजी भिडे यांच्याविरोधात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन केले जात आहे. तसेच यापूर्वी संभाजी भिडे यांनी अमरावतीमध्ये राष्ट्रपित्याबाबत अनुदार उद्‍गार काढून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रपित्याबाबत वाईट टिपणी करणे संपूर्ण देशासाठी लाजिरवाणे असून सरकारने आजच बंदोबस्त करून त्यांना अटक करावी, अशी मागणी देखील राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली होती. त्यानंतर अखेर आज अमरावती येथे संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भिडे काय म्हणाले?

अमरावतीच्या बडनेर येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडेंनी महात्मा गांधींच्या वडिलांबाबत केलेलं विधान वादात सापडलं आहे. करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र असल्याचे वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं. इतकेच नाही तर मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केल्याचा दावा देखील असं संभाजी भिडेंनी केला. दरम्या या विधानानंतर काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भुमिका घेत भिडेंना अटक करण्याची मागणी काँग्रेस पक्षाकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : पिकाचा पंचनामा करताना तलाठ्याला सर्पदंश

Video: अन् त्याने जोरात आईला ओढलं; तीन वर्षांच्या चिमुकल्याने पाच सेकंदात वाचवला आईचा जीव

LPG Price Hike: दिवाळीच्या आधीच महागाईचा तडाखा; एलपीजी गॅसचे दर वाढले, तुमच्या शहरात किती झाली किंमत?

Kids Health: लठ्ठ मुलांना प्रौढावस्थेत आरोग्याचा गंभीर धोका 'या' समस्या उद्‍भवण्याचा तज्ज्ञांचा इशारा

SCROLL FOR NEXT