Yuvraj Sambhajiraje Chhatrapati  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sambhajiraje : 'संयोगीताराजे यांनी सत्याची बाजू मांडली' काळाराम मंदिर प्रकरणावर संभाजीराजे म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः काळाराम मंदिरातलं वेदोक्त मंत्र प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. वेदोक्त मंत्र म्हणण्यास संभाजीराजेंच्या पत्नी संयोगीताराजे यांना मज्जाव केल्याचा आरोप होत आहे. त्यावर संभाजीराजे यांनी आज प्रतिक्रिया दिली.

संयोगीताराजे छत्रपती यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर याबाबत पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केल्याचं नमूद केलं होतं. त्यानंतर महंतांना राज्यभरातून विरोध झाला.

हेही वाचाः महिलांनो तरुणपणी घेतलेली जमीन उतारवयात होईल आधार

संयोगीताराजेंच्या या आरोपांवर आज पहिल्यांदाच संभाजीराजे छत्रपती यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले की, संयोगीताराजे ह्या सत्याजी बाजू परखडपणे मांडतात. त्यांना काळाराम मंदिरात जो अनुभव आला तो त्यांनी मांडला, त्याचा मला अभिमान आहे.

संभाजीराजे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये अशी कृत्ये करणारी लोकं का निर्माण होतात, हे मला कळत नाही. हे राज्य फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांनी चालणारे राज्य आहे. प्रत्येकाला मंदिरात जावून धर्मविधी करण्याचा अधिकार आहे. शंभर वर्षांपूर्वी जो त्रास महापुरुषांना भोगावा लागला तोच प्रकार आणखी सुरु असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं.

नेमकं काय घडलं?

नाशिकच्या काळाराम मंदिरातील महंतांनी दर्शनासाठी आलेल्या संयोगिताराजे यांच्यासमोर पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. पण कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला, अशी पोस्ट छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांनी केली आहे.

पूजेदरम्यान काळाराम मंदिरातील महंतांनी संयोगीताराजे यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही, हे सांगायचा प्रयत्न केला होता. त्यावेळी संयोगीताराजे छत्रपती यांनी महंतांना खडे बोल सुनावत रामरक्षा म्हटली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT