Sambhaji Raje devendra fadanvis swapnil joshi 
महाराष्ट्र बातम्या

Sambhaji Raje: संभाजीराजे आक्रमक! फडणवीसांसह अभिनेता स्वप्नीलला झोडलं, विधान भवनावर चालून येण्याचा इशारा

Sambhaji Raje on online rummy: कायद्यात तुम्ही बदल केला नाही किंवा सभागृहात या विषय मांडला नाही तर येत्या ९ तारखेला आम्ही तुम्हाला जाब विचारु, असा इशारा संभाजीराजे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- ऑनलाईन रमी, ऑनलाईन जुगारबाबत स्वराज्य पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. हे तात्काळ बंद करावेत. या कायद्यात तुम्ही बदल केला नाही किंवा सभागृहात या विषय मांडला नाही तर येत्या ९ तारखेला आम्ही तुम्हाला जाब विचारु, असा इशारा संभाजीराजे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

संभाजीराजेंनी म्हटलंय की, स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॅा धनंजय जाधव यांनी पोलिसांकडे पाठपुरावा केला.पोलिस म्हणतात की ऑनलाईन रमी, ऑनलाईन जुगार असे खेळ खेळू नका. ते बेकायदेशीर आहेत आणि कोण खेळताना दिसले की त्याच्यावर कडक कारवाई करणार ! आणि त्याच पोलिसांचे गृहमंत्री काय म्हणतात ? आपल्याला GST मिळतो... पैसा मिळतो... मग चालूदे ! म्हणजे गृहमंत्री आणि पोलीस यांच्यातही काही समन्वय नाही...!

रमी खेळणं म्हणजे वाईट गोष्ट आहे, चुकीची गोष्ट आहे अशी शिकवण आपल्याला लहानपणापासूनच समाजात मिळत असते. मात्र आता उघडपणे रमी खेळा म्हणून केल्या जाणाऱ्या जाहिराती आपण समाज म्हणून कशा काय सहन करू शकतो? मला फडणवीस साहेबांच्या वक्तव्याच आश्चर्य वाटतं, पण आरआर आबा यांच्या सारखा धाडसी निर्णय फडणवीस घेणार का ? असा सवाल त्यांनी केला.

हे सर्व थांबावं यासाठी गेल्या वर्षभरापासून स्वराज्य पक्षाने यावर सर्व चौकशी करून, या विषयाच्या मुळापर्यंत जात सर्व माहिती काढलेली आहे.ज्या जाहिराती दाखवल्या जातात, जाहिरातींमधून जी प्रलोभने दिली जातात, श्रीमंत होण्याचे आमिष दाखवले जाते ते सर्व खोटे असते याचे सर्व पुरावे स्वराज्य पक्षाने गोळा केलेले आहेत.

ज्या रीलस्टार्सनी अशा जाहिराती केलेल्या आहेत, ऑनलाईन ॲपवर रमी खेळून आम्ही लाखो रुपये जिंकलो म्हणून सांगत आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही पडताळणी केली. तर सर्वांनी मान्य केले आहे की केवळ रमी कंपनीने पैसे दिले म्हणून आम्ही जाहिरातीतून खोटी माहिती दिली. आम्ही पैसे वगैरे काहीही जिंकलेलो नाही, अशी माहिती संभाजीराजेंनी दिली.

मराठी मधील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी याला देखील स्वराज्याच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधून त्याच्याकडे पडताळणी केली. तर त्यानेही मान्य केले की माणूस म्हणून मला हे चुकीचे वाटते! केवळ पैशांसाठी जर कोणतेही ॲक्टर मंडळी अशा चुकीच्या गोष्टींच्या जाहिराती करून तरुणाईला चुकीच्या मार्गाला लावणार असतील, तर अशा विकाऊ ॲक्टर लोकांना सुद्धा स्वराज्य धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. जाहिराती करताना या लोकांनी सुद्धा सामाजिक भान आणि तारतम्य बाळगले पाहिजे, असं ते म्हणाले.

स्वप्नील सारख्या कलाकारांनी केवळ ते व्हिडिओ डिलिट करुन चालणार नाही तर तुम्ही जाहीरपणे लोकांना याबद्दल भूमिका मांडावी, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं. मागणी मान्य न झाल्यास स्वत: संभाजीराजे आणि स्वराज्याचे सगळे कार्यकर्ते विधान भवनावर चालून येणार आहेत.

वर्षभरात गोळा केलेले सर्व पुरावे राज्य सरकारला देऊन हे ॲप, वेबसाईट, जाहिराती बंद कराव्यात. त्यांना राज्यात पूर्णपणे बंदी घालावी, यासाठी स्वराज्य पक्षाने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आहे. मात्र राज्य सरकार कडून याविषयावर स्वराज्य पक्षाला काहीच प्रतिसाद मिळाला नाही, असंही ते म्हणाले.

पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला आणि विशेषत: गृहमंत्र्यांना इशारा दिला आहे, की चालू अधिवेशनात राज्य सरकारने याविषयी कायदा करावा व रमी सर्कल, जंगली रमी, ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंगचे ॲप यांना महाराष्ट्रात पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, अशी मागणी संभाजीराजेंनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Strike : सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा बेमुदत संप तुर्तास स्थगित मात्र 11 नोव्हेंबरला करणार निदर्शने आंदोलन!

माधवी खंडाळकर कुणाच्या सांगण्यावरून बोलत आहेत? राष्ट्रवादीतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर; रुपाली ठोंबरेंचे चाकणकरांवर गंभीर आरोप

Crime: जावयानं माझ्या मुलीला मारलं, सासूची तक्रार... मात्र सत्य समोर आल्यानंतर तोंड लपवावं लागलं, प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : शरद पवार गटाचे माजी नगरसेवक चंद्रकांत टिंगरे अजित पवारांच्या भेटीला

Pune Crime: आधी खून मग लोखंडी भट्टीमध्ये पत्नीचा मृतदेह जाळला; पुण्यातल्या वारजे भागात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT