sambhajiraje eskal
महाराष्ट्र बातम्या

आमरण उपोषण कशासाठी? संभाजीराजेंनी केलं ट्वीट, म्हणाले...

राज्यसरकारने आरक्षणासाठी कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्यानं संभाजीराजे उपोषणाला बसणारेत.

सकाळ डिजिटल टीम

राज्यसरकारने आरक्षणासाठी कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्यानं संभाजीराजे उपोषणाला बसणारेत.

संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला आहे. यावेळी आक्रमक पवित्रा घेत, मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीला स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानात बसणार असल्याचे त्यांनी जाहरी केले आहे. दरम्यान, राज्यसरकारने आरक्षणासाठी कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याने २६ फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार असल्याचे पत्रही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहले आहे. दरम्यान, आता त्यांनी एक ट्वीट करुन आमरण उपोषण कशासाठी हे स्पष्ट केलं आहे.

यात ते म्हणतात, सारथी संस्थेच्या सबलीकरणासाठी रोड मॅप तयार करुन सारथी संस्थेचे सक्षमीकरण करावे. आणि येणाऱ्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात यासाठी भरीव निधीची तरतूद करावी, या मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे.

ते पुढे म्हणतात, सारथी संस्थेच्या सबलीकरणासाठी निधी मागितला होता. मात्र तो निधी एकदम न देता सारथीच्या विकासाचा आराखडा तयार करून त्याप्रमाणे अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. आवश्यक तितकाच निधी वेळोवेळी सारथी संस्थेला वर्ग करू, असे आश्वासनही सरकारकडून देण्यात आले होते. याप्रकरणी जागा हस्तांतर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग येथील मराठा युवकांसाठी विविध प्रकारचे उपक्रम या केंद्रातून सुरू करणे आवश्यक आहे. सारथीचा कारभार नव्याने सुरू झाल्यानंतर नाशिक येथे वसतिगृह इमारत प्रस्ताव, जागेचा प्रस्ताव, पुणे येथे पार्वती, एफसी रोड येथील जलसंपदा विभागाची जागा यांचे प्रस्ताव शासनाकडे गेले असून त्याचा हस्तांतर निर्णय झालेला नाही, अशा काही मागण्या त्यांनी केल्या आहेत. या ट्वीटमध्ये त्यांनी आमरण उपोषण कशासाठी हे सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT