sambhajiraje eskal
महाराष्ट्र बातम्या

ओवैसींच्या कबर दर्शनावर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी काल औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्याने नवा वाद उद्भवला आहे.

सकाळ डिजिटल टीम

तेलंगणचे एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी काल औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यावरून आता नवा वाद उद्भवला आहे. याच घटनेबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजीराजे छत्रपती याविषयी माध्यमांशी बोलताना म्हणाले, "याबद्दल माझ्या कानावर संध्याकाळी आलं आहे की त्यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी गेले आणि चादर तिथे टाकली. कानावर आलंय असं माझ्या, पण मी त्याचा अभ्यास करतो. त्यावर अचानक प्रतिक्रिया देणं मला बरोबर वाटत नाही. पण जर खरंच तसं झालं असेल, तर असं करणं बरोबर नाही, योग्य नाही. शिवाजी महाराजांच्या भूमीत हे योग्य नाही."

तेलंगणमधले एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्याबरोबर खासदार इम्तियाज जलील हेही उपस्थित होते. याच प्रकरणावरून आता वादंग उठला आहे. विविध पक्षांच्या नेत्यांनी या कृतीचा निषेध केला आहे. मात्र खुल्ताबादमध्ये अनेक दर्गे आहेत, कोणीही तिथे गेलं, तर त्या कबरीचं दर्शन घेतंच, त्यामुळे कोणी त्यातून वाईट अर्थ काढू नये, अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT