SambhajiRaje Chhatrapati nominated by Mahavikas Aghadi SambhajiRaje Chhatrapati nominated by Mahavikas Aghadi
महाराष्ट्र बातम्या

संभाजीराजे यांना ‘माविआ’कडून उमेदवारी? भाजपला शह देण्याचा प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीचे वार वाहत आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे म्हटले होते. अशात त्यांनी गुरुवारी (ता. १९) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. आता संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती आहे. (SambhajiRaje Chhatrapati nominated by Mahavikas Aghadi)

टीव्ही ९ ने दिलेल्या माहितीनुसार, संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाल्यानंतरच यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. भाजपला शह देण्यासाठी महाविकास आघाडीकडून ही खेळी खेळली जाणार आहे.

संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभेसाठी अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले होते. तसेच त्यांनी सर्व आमदारांना पत्रही लिहिले होते. या पत्रात विजयी होण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. दुसरीकडे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संभाजीराजे यांना सहकार्य करेल असे सांगितले होते. मात्र, आता संभाजीराजे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने त्यांचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.

दहा जूनला मतदान

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी दहा जूनला मतदान होणार आहे. निवडणुकीत भाजपचे दोन, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येईल इतके संख्याबळ पक्षांकडे आहे. तर सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती. आता संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT