delhi esakal
महाराष्ट्र बातम्या

दिल्लीत खलबतं: 'अनेक गोष्टी अडचणीत', संभाजीराजे राऊतांच्या भेटीला

आरक्षणासंदर्भात जो निर्णय होईल त्याप्रमाणे अंमलबजावणी होईल - संभाजीराजे

सकाळ डिजिटल टीम

आरक्षणासंदर्भात जो निर्णय होईल त्याप्रमाणे अंमलबजावणी होईल - संभाजीराजे

संभाजीराजे छत्रपती यांनी आज संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली आहे. दरम्यान, आता या भेटीवरून संजय राऊत निवासस्थानी खलबंत सुरु असल्याचं बोललं जात आहे. दिल्लीत आल्यावर मी राऊतांना भेटत असतो ही अनौपचारिक भेट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी संभाजीराजे (Sambhajiraje) मराठा आंदोलनाविषयी (Maratha Reservation) म्हणाले, आजही बऱ्याच गोष्टी अडचणीत आहेत. जे पाच मूलभूत प्रश्न महाराष्ट्र शासन सोडवू शकते, ते अजूनही सुटलेले नाहीत. त्यासंदर्भात मराठा संघटना लवकरच निर्णय घेणार आहेत. तो घेतला जाईल आणि त्याप्रमाणेच मी चालतो आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांनाही (CM Uddhav Thackeray) मी नेहमीच भेटतो त्यांना हा विषय माहीत आहे. याआधीही मी त्यांना याची कल्पना दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

दरवर्षी मला न चुकता ते जेवायला बोलवतात आणि आज माझी सकाळी येऊन चहा घ्यावा अशी इच्छा झाल्यानं मी आलो आहे बाकी काहीही विषय नाही असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी एक किस्सा सांगितला. दिल्लीत हीचे वैशिष्ट्ये असल्याचेही त्यांनी हसत स्पष्ट केले. दरम्यान, आज अचानक संभाजीराजेंनी घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT