Same-Sex Marriage 
महाराष्ट्र बातम्या

Same-sex marriage : समलैंगिक विवाह देशात चिंताजनक विषय! सर्वेक्षणात नागरिकांचे मत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वैयक्तिक पातळीवर समलैंगिक विवाहांचा स्वीकार करण्याबाबत बहुतांश व्यक्तींचा दृष्टिकोन पारंपरिक आहे. तसेच समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता दिल्यास समाजावर विपरीत परिणाम होण्याची भीती वाटते, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

समलैंगिक विवाहांबाबत नागरिकांचे काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आणि या विषयावर समाजात प्रचलित असलेले मत समजून घेण्यासाठी पुण्यातील दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राने हे सर्वेक्षण केले आहे. प्रतिसाद देणाऱ्यांपैकी ८३.९ टक्के लोकांनी समलैंगिक विवाह हा भारतात चिंताजनक विषय असल्याचे म्हटले आहे, तर केवळ १६.१ टक्के लोकांनी हा विषय गंभीर नसल्याचे नमूद केले आहे.

समाजातील स्त्रियांचे स्थान आणि संबंधित मुद्द्यांवर केंद्र गेली २० वर्षांपासून संशोधन करत आहे. समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या १६ याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली.

असे पार पडले सर्वेक्षण :

- एकूण भाषा - १३

- प्रतिसाद देणाऱ्यांची विभागणी - १८ ते २५, २६ ते ४०, ४१ ते ६० आणि ६० पेक्षा अधिक असे चार वयोगट

- पुरुष, स्त्री व अन्य या तीन लिंगांमध्ये विभागणी

सर्वेक्षणातून समोर आलेले महत्त्वाचे मुद्दे :

- प्रतिसाद देणाऱ्या ७५ टक्के लोकांना समलैंगिक विवाह नैसर्गिक वाटतो

- समलैंगिक विवाहांचा भारतीय समाजावर विपरीत परिणाम होर्इल सांगण्याची संख्या सर्वाधिक

- बहुतांश व्यक्तींनी त्यांच्या किंवा जवळच्या कुटुंबातील समलैंगिक विवाहांना पाठिंबा न देण्याची भूमिका

- देशभरातील सर्व जाती धर्मातून या सर्वेक्षणासाठी प्रतिसाद

- कुमार वयातील मुलामुलींवर होणारे दुष्परिणाम यावर तीव्र चिंता व्यक्त केली गेली आहे

- ज्या बाहेरील देशांत याबाबत दुष्परिणाम दिसू लागले आहेत त्याकडे आपण लक्ष देत त्याकडे डोळसपणे पाहिले पाहिजे.

- कोणताही निर्णय घेण्यापूर्वी उद्भवू शकणाऱ्या समस्यांवर अध्ययन होणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

२४ तासात आरोपी ताब्यात! बाहेरच्या टॅक्सी चालकाला लोणावळ्यात मारहाण; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

Kolhapur news: मुदाळतिट्टा चौकात वाहतूक कोंडीचा महापूर! वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि प्रवाशांचा त्रास शिगेला

Shrikant Shinde: शिवसेनेला शक्ती प्रदर्शनाची गरज नाही, अंबरनाथमध्ये भगवा ठाम; श्रीकांत शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

शुभमन गिलचं साराशी लग्न कधी? चाहत्याने थेट वडिलांनाच विचारला प्रश्न, Video तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT