महाराष्ट्र बातम्या

Sameer Bhujbal : ''आम्ही त्यांना मोबदला दिला होता'', घर लाटलेल्या प्रकरणात समीर भुजबळांची प्रतिक्रिया

संतोष कानडे

मुंबईः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शनिवारी छगन भुजबळ यांच्या सांताक्रूझ येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांनी त्यांना रोखलं. भुजबळांनी फर्नांडिस कुटुंबियांचं घर लाटलं आणि त्याजागी टोलेजंग इमारत बांधली, शिवाय मोबदला देण्याचं कबुल करुनही पैसे दिले नाही. असा आरोप दमानियांनी केला.

या आरोपांवर शनिवारीच छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली होती. आता रविवारी समीर भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप खोडून काढले आहेत. ते म्हणाले की, आम्ही फर्नांडिस कुटुंबियांचा मोबदला रहेजा आणि नरोना यांना दिला होता. पुन्हा एकदा जेव्हा इमारतीचं काम पूर्ण झालं तेव्हा २०१४ मध्ये मोबदला घ्या म्हणालो होतो.

तेव्हा त्यांनी संपूर्ण कागदपत्रांवर सह्या केलेल्या होत्या. पुन्हा त्यांनी येऊन इंटरेस्ट नसल्याचं सांगितलं होतं. आम्ही जो सहानुभूतीपूर्वक मोबदला देणार होतो, तो राहून गेला. जागा घ्या किंवा पैसे घ्या.. म्हणत होतो. परंतु त्यांचं उत्तर आलं नाही.

भुजबळ पुढे म्हणाले, दमानिया यांनी आमच्यावर अनेक आरोप केलेले होते. त्यानंतर आमच्या अनेक प्रॉपर्टी ईडीने अॅटॅच केलेल्या आहेत. त्यातच ही इमारतदेखील जोडली गेलेली आहे. आता दमानिया यांनी आमच्याविरोधाक कटकारस्थान रचण्याचं काम केलं आहे. प्रकरण कोर्टात असून कोर्ट जो निकाल देईल, तो आम्हाला मान्य असेल.

छगन भुजबळ काय म्हणाले होते?

अंजली दमानिया यांच्याबद्दल मी अधिक काही बोलणार नाही. सुपारी घेऊन बोलणाऱ्या लोकांबद्दल मी काय बोलणार? आम्ही कुणाचंही घर लाटलेलं नाही. या प्रकरणाची केस कोर्टामध्ये सुरु असून जो निकाल येईल, तो आम्हाला मान्य असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT