Nawab Malik  Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

"मालदीवला गेलो होतो, पण..."; आरोपांवर वानखेडेंचं स्पष्टीकरण

नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी क्रुझ ड्रग पार्टीवर एनसीबीने केलेल्या कारवाईनंतर गंभीर आरोप केले आहेत. त्यावर आता समीर वानखेडेंनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलंय. माझ्यावर गेल्या पंधरा दिवसांपासून वैयक्तिक आरोप होत आहे, माझ्या वडिल आणि बहिणींवरही आरोप केले जात आहे. हे चूकीचे आहे. जे होतंय त्याची तपासणीही होणार आहे. ज्यांनी आरोप केले आहेत, ते मोठे मंत्री आहे. त्यामुळे त्यांना कदाचित आरोप किंवा टीका करण्याचा अधिकार असेलही, मी एक छोटा अधिकारी आहे. मी माझे काम केले आहे. मी मालदीवला गेलो होतो. पण ते कशासाठी हे कारण आपण समजून घ्यायला हवं असं मला वाटत असल्याचं वानखेडेंनी सांगितलं.

माध्यमांशी बोलताना समीर वानखेडे म्हणाले, दोन मुलांच्या आईवर आरोप लावले जात आहे. माझ्या 70 वर्षांच्या वडिलांवरही आरोप लावले जात आहे. हे सगळं कशासाठी, मी माझ्या ध्येयापासून जराही ढळलेलो नाही. मी माझ्या बहिणीसोबत दुबईला कधीही गेलो नव्हतो. मलिक म्हणाले मी मालदीवला गेलो होतो, ते खरे आहे. पण मी माझ्या कुटूंबियांसमवेत गेलो होतो. आणि सरकारची परवानगी घेऊन गेलो होतो. गेल्या १५ दिवसांपासून माझ्यावर वडिलांवर, बायकोवर टीका केली आहे. ते मोठे मंत्री आहे. मी माझे काम करतो आहे. त्यांना अधिकार आहे. देशसेवा केली आहे. आरोपांचे खंडन केले आहे. मला लक्ष्य केले जात आहे.

मलिक यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये समीर वानखेडेंवर सडकून टीका केलीय. त्यांनी एका वर्षाच्या आत वानखेडे यांची नोकरी जाणार असल्याचे सांगितलं आहे. ते आणि त्यांचे कुटूंबिय बोगस आहेत. अशा शब्दांत त्यांनी टीका करताना सध्या आर्यन खानचे जे प्रकरण आहे ते खोटं असल्याचे ही सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षाही अपुरी- न्यायाधीश

Palghar: पालघर बनणार चौथी मुंबई ! गेमचेंजर प्रकल्पांना गती येणार, कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Malware Alert : लॅपटॉप-कॉम्प्युटरवर WhatsApp वापरताय? CERT-In ने दिला गंभीर इशारा, 'हा' मेसेज बघताच बँक अकाउंट होईल रिकामं

Nasrapur Case Verdict : नसरापूर हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? आज न्यायालयाचा अंतिम निकाल

Shaktipeeth Highway : अदानी-अंबानींसाठी सुपीक जमीन जाणार? 'शक्तिपीठ' महामार्गावरून सांगलीतील शेतकऱ्यांचा एल्गार, जिल्हा परिषदेवर वाढला दबाव

SCROLL FOR NEXT