nawab malik-sameer wankhede esakal
महाराष्ट्र बातम्या

हास्यास्पद! NCB अधिकाऱ्याच्या 'त्या' पत्रावर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आर्यन खान ड्रग्स प्रकरणात (aryan khan drugs case) एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (NCB officer Sameer Wankhede) स्वतःच अडकत असल्याचे दिसत आहेत. त्यांच्यावर नवाब मलिकांनी गंभीर आरोप केले आहेत. आज एनसीबीच्या एका अज्ञात अधिकाऱ्याने पत्र दिले (NCB Officer letter to nawab malik) असून त्यामध्ये वानखेडेंनी खोट्या कारवाया केल्या, असं नवाब मलिक म्हणाले. त्यावरच आता समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवाब मलिकांनी म्हटलंय की, ट्विटरवर एक पत्र मी पोस्ट केलंय. एनसीबीतील एका अधिकाऱ्याने मला पाठवलंय. दोन दिवसांपूर्वी मला ते मिळालंय. राज्याचे मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील ते पत्र मी दिलंय. यामध्ये 26 प्रकरणांचा उल्लेख केला करण्यात आला आहे. कशाप्रकारे वसुली केली जाते, कशाप्रकारे चुकीची कामे केली जाते, याचा उल्लेख त्या पत्रात आहे. एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्याकडून हे पत्र मला प्राप्त झालं आहे, असे नवाब मलिक म्हणाले.

समीर वानखेडेंचं उत्तर -

नवाब मलिक यांना जे वाटतं ते करतात. त्यांना मिळालेलं पत्र खोटं आणि हास्यास्पद आहे. पत्रातील मजकूर खोटा असून हे सर्व बनावट पत्र आहे, असं समीर वानखेडे म्हणाले.

पत्रात नेमकं काय म्हटलंय? -

''बॉलीवूड कलाकारांना ड्रग्ज प्रकरणांमध्ये अडकवण्यासाठी समीर वानखेडे आणि केपीएस मल्होत्रा कार्यरत आहेत. या कलाकारांकडून करोडो रुपये मागून त्यातला काही हिस्सा राकेश अस्थाना यांनाही दिला. वकील अयाज खान यांच्याकडे है पेसे दिले गेले. या कलाकारांमध्ये दीपिका पादुकोण, करिश्मा प्रकाश, श्रद्धा कपूर, रकूल प्रीत सिंह, सारा अली खान, भारती सिंह, हर्ष लिम्बाचिया, रिया चक्रवर्ती, सोविक चक्रवर्ती व अर्जुन रामपाल यांचा समावेश आहे. समीर वानखेडे हे प्रसिद्धी मिळविण्यासाठी काहीही करतात. त्यांनी अनेक निर्दोष लोकांना खोट्या NDPS केसेसमध्ये अडकवले आहे. यासाठी एक वेगळी टीम बनवली असून ते एखाद्याच्या घरात ड्रग्स प्लाँट करतात आणि खोट्या केसेस दाखल करतात. तसेच राकेश अस्थाना यांनी अमित शाह यांना सांगून अवैधरित्या समीर वानखेडे यांची एनसीबीच्या झोनल डायरेक्टरपदी नियुक्त केली आहे'', असे आरोप पत्रामध्ये करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

SCROLL FOR NEXT