Sameer Wankhede Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

समीर वानखेडे कुटुंबासह राज्यपालांच्या भेटीला

समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिकांनी आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.

सुधीर काकडे

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी क्रूझ ड्रग प्रकरणात एनसीबीने केलेल्या कारवाईवरून समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांबद्दल देखील अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर नवाब मलिक यांनी सोशल मीडियावर आपल्या कुटुंबीयांची बदनामी केल्याचा आरोप ज्ञानदेव वानखेडेंनी केला होता. याच संदर्भात आज ते राज्यपालांकडे आपली कैफीयत मांडणार असल्याची शक्यता आहे.

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर आपली आणि कुटुंबीयांची बदनामी होत असल्याचा आरोप वानखेडे यांनी केला आहे. त्यातच आज समीर वानखेडे हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीला गेले आहेत. आपल्या कुटुंबाच्या बदनामी प्रकरणात ते राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनीही पत्रकार परिषद घेत नवाब मलिक हे आपल्या कुटुंबाची बदनामी करत असल्याचा आरोप केला होता. त्यानुसार नवाब मलिक यांच्याविरोधात आपण कोर्टात कायदेशीर लढाई लढणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Day 4: भारताचा श्रीलंकेवर कहर! 290 धावांत ऑलआऊट करत दिला फॉलोऑन; दिनुशाचं शतकही व्यर्थ

Palghar Attack Case: कोयत्याने वार केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू ; दोन महिन्याच्या उपचारानंतरही झुंज अपयशी

भावांची एक लाईन आणि ओवाळणाऱ्या बहिणींची दुसरी लाईन... झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या रक्षाबंधनाच्या आठवणी

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

CTET 2026 New Date : सीटीईटी परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली; नवी तारीख 'या' दिवशी होणार जाहीर

SCROLL FOR NEXT