Samruddhi Expressway sakal
महाराष्ट्र बातम्या

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरचे अपघात होणार कमी; कसे ? वाचा सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा ओलांडणाऱ्या आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे एकूण १५ इंटरसेप्टर वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी (ता. २७) महामार्ग पोलिसांना हस्तांतरित करण्यात आली.

ठाण्यात पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवल्यानंतर सर्व वाहने समृद्धी महामार्गाच्या दिशेने मार्गस्थ झाली. या वेळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे उपस्थित होते.

समृद्धी महामार्ग हा ७०१ किलोमीटरचा असून इगतपुरीपर्यंत तो वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. या मार्गावर अपघात रोखण्यासाठी अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) यांनी १५ महामार्ग पोलिस केंद्राकरिता इंटरसेप्टर वाहनांची मागणी महामंडळाकडे केली होती.

त्यानुसार १५ वाहने खरेदी करण्यात आली असून या वाहनांना ब्लिंकिंग लाईट बार, प्राथमिक उपचार सामग्री, अग्निशमन यंत्रणा महामंडळाकडून जोडण्यात आली आहे. \

या महामार्गावर बहुतांश ठिकाणी दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत उभारली आहे. वन्यप्राण्यांची व मोकाट जनावरांची ये-जा होऊ नये म्हणून क्रॅश बॅरिअरच्या बाजूने चेन लिंक फेन्सिंग उभारण्यात येणार आहे.

दरम्यान, समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक शीघ्र प्रतिसाद वाहने २१, रुग्णवाहिका २१, ई.पी.सी. गस्त वाहने १४, महामार्ग सुरक्षा पोलिस केंद्रे १३, ३० टन क्षमतेची क्रेन १३, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत १४२ सुरक्षारक्षक अशा प्रकारच्या उपाययोजना सज्ज ठेवल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: साडेतीनशे टक्के शुल्क लावणार होतो; ट्रम्प यांच्याकडून संघर्ष थांबविल्याचा पुनरुच्चार

Viral Video Teacher : शाळेतच मुख्याध्यापकाचा इंग्लिश नजराणा! प्रार्थना सुरू असताना कांबळे सर टल्ली होऊन नाचू लागले अन् व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Latest Marathi News Live Update : मालेगावात आंदोलकांचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न

Pandit Deshmukh Murder Case: कोण होते पंडित कमलाकर देशमुख, कशी झाली होती हत्या? सोलापूर हादरवणारी Exclusive माहिती

Hasan Mushrif Kagal : हसन मुश्रीफांच्या मनातलं आलं ओठावर, समरजित घाटगेंसोबत मनोमिलन करणाऱ्या अदृश्य शक्तीचं नाव केलं उघड; मंडलिकांवरही म्हणाले...

SCROLL FOR NEXT