Amit Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Amit Thackrey: टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसेच्या ८ कार्यकर्त्यांना अटक; अमित ठाकरेंच्या गाडीवरून...

मनसैनिकांनी समृद्धी महामार्गावरील गोंदे टोलनाका फोडला

अंकिता खाणे (Ankita Khane)

समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची गाडी अडवल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोलनाका मनसे कार्यकर्त्यांनी फोडला. मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर हल्लाबोल केला. अमित ठाकरे यांचा अपमान करण्यात आल्याचा मनसैनिकांचा आरोप आहे.

तर समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याच्या तोडफोड प्रकरणी मनसेचे ८ पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना अटक करण्यात आली आहे. एकूण १२ ते १८ अज्ञाताप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यातील ८ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. अन्य ४ ते ६ जणांचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी आणि राज्य कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे.

शनिवारी रात्री अमित ठाकरे समृद्धी महामार्गावरून जाताना टोल नाक्यावर त्यांच्या वाहनाला अडवण्यात आलं होतं. त्याचा राग मनात ठेवत १२ ते १५ पदाधिकाऱ्यांनी टोल नाक्याची तोडफोड केली होती. त्यानंतर टोल प्रशासनाने पोलिसांकडे तक्रार देताच ग्रामीण पोलिसांनी ८ जणांना अटक केली आहे. यामध्ये मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी आणि राज्यकार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे.

त्याचबरोबर इतर व्यक्तींचा शोध पोलीस करत आहेत. यामधील काही पदाधिकारी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.

अमित ठाकरे यांची काय प्रतिक्रिया?

टोलनाक्यावरच्या कर्मचाऱ्यांची उद्धट भाषा होती. फास्टटॅग असूनही गाडी बराचवेळ थांबवली. टोलनाक्याची टेक्निकल अडचण होती. मॅनेजरसह कर्मचाऱ्याची भाषा उद्धटपणाची होती” असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर मला नाशिकला पोहचल्यावर कळलं, की टोलनाका फोडला. राज ठाकरेंमुळे अनेक टोलनाके बंद झाले. माझ्यामुळे आणखी एक वाढला, असं अमित ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT