अमरावती ः विजयी संघासह प्रशिक्षक व अन्य.
अमरावती ः विजयी संघासह प्रशिक्षक व अन्य. 
महाराष्ट्र

राज्यस्तरीय समरगीत स्पर्धेत अमरावती संघ विजेता

सकाळवृत्तसेवा

अमरावती : राज्यस्तरीय समरगीत स्पर्धेत अमरावतीच्या कामगार कल्याण केंद्र (गांधी चौक) गट कार्यालय अमरावती संघाने प्रथम क्रमांक पटकावला. "एकच घोष त्रिवार' हे समरगीत या संघाने सादर केले होते.
सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे 30 ऑगस्टला राज्यस्तरीय समरगीत स्पर्धा पार पडली. राज्यभरातून 18 समरगीत संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षक दीपक कलढोणे, संतोष कोळाळीकर, स्मिता देशपांडे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त सतीश दाभाडे, सहायक कल्याण आयुक्त घनश्‍याम कुळमेथे, समाधान भोसले यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. त्याच दिवशी सायंकाळी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ झाला. राज्यमंत्री तथा पालकमंत्री विजय देशमुख, स्पेक्‍ट्रम अकादमी नाशिकचे संचालक सुनील पाटील, सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष शरदकृष्ण ठाकरे, कामागार कल्याण मंडळाचे आयुक्त सतीश दाभाडे, सहायक आयुक्त घनश्‍याम कुळमेथे व समाधान भोसले या वेळी उपस्थित होते. विजेत्या अमरावतीच्या संघाला मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यामध्ये केंद्रप्रमुख सचिन खारोडे, संघप्रमुख समर कनकुरे, कलावंत पुरुषोत्तम लोखंडे, यशराज यावले, अक्षय कातोरे, सैराग ठाकरे, तेजस कडू, सतीश जाधव, श्रीकांत सातंगे, अंबादास खंडारे, मनाली पांडे, अदिती रोटे, सुरभी खैरकर, कांचन सदाशिव यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT