schools sakal
महाराष्ट्र बातम्या

जूनमध्ये होणार संचमान्यता! १०९५ शिक्षकांना १५ जूनपासून जावे लागणार नवीन जिल्हा परिषदेच्या शाळांवर

जिल्हा परिषद शाळांमधील एक हजार ९५ शिक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या झाल्या आहेत. त्यांना कार्यमुक्तीचे आदेश देण्यात आले असून १५ जूनपासून ते नवीन शाळांवर रुजू होतील. बदल्यांचा पुढचा टप्पा जून-जुलैमध्ये होऊ शकतो, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हा परिषद शाळांमधील एक हजार ९५ शिक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या झाल्या आहेत. त्यांना कार्यमुक्तीचे आदेश देण्यात आले असून १५ जूनपासून ते नवीन शाळांवर रुजू होतील. बदल्यांचा पुढचा टप्पा जून-जुलैमध्ये होऊ शकतो, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली.

सोलापूर जिल्हा परिषदेअंतर्गत दोन हजार ७९५ शाळा असून त्यात सव्वादोन लाखांपर्यंत विद्यार्थी प्रवेशित आहेत. ‘आरटीई’नुसार, प्रत्येक ३० मुलांसाठी एक शिक्षक, असे समीकरण आहे. आता मागील शैक्षणिक वर्षाची संचमान्यता अजून झालेली नाही. सध्या शाळांमधील प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही सुरु आहे.

जिल्हा परिषद शाळांमधील ८० टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून त्रुटींची दुरुस्ती देखील करण्यात आली आहे. अजून २० टक्के विद्यार्थ्यांचे काम बाकी असून आगामी काही दिवसात ते पूर्ण करावेच लागणार आहे. नाहीतर त्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात तेवढे शिक्षक अतिरिक्त होऊ शकतात. आता पुढील आठ-दहा दिवसात जिल्हा परिषदेच्या शाळांची संचमान्यता होणार आहे. संचमान्यतेनंतर शिक्षकांची नेमकी किती पदे रिक्त आहेत, हे स्पष्ट होणार आहे. जुलैमध्ये रिक्त पदांची भरती होईल, असा विश्वास शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

समाजशास्त्र विषय शिक्षकांचा मिटणार प्रश्न

इयत्ता सहावी व सातवीच्या वर्गात किमान दोन जरी विद्यार्थी असतील, तरी त्याठिकाणी विज्ञान-गणित व भाषेचा प्रत्येकी एक शिक्षक दिला जातो. त्यानंतर पटसंख्या ४५ पेक्षा अधिक झाली आणि पुढे तेथे आठवीचा वर्ग असल्यास तिसरे पद समाजशास्त्राचे मंजूर होते. पटसंख्या ७५ ते १०० पर्यंत असल्यास त्या शाळांमध्ये चौथा शिक्षक विज्ञान विषयाचा मिळतो.

सध्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये समाजशास्त्र विषयाचे १६१ पदे मंजूर आहेत, पण सध्या ४०० शिक्षक आहेत. त्यामुळे सध्या २३९ शिक्षक अतिरिक्त असून त्यापैकी २१० शिक्षकांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे लिखित स्वरूपात उपशिक्षक करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार, विषय शिक्षकांवर सहावी ते आठवीची तर उपशिक्षकांवर पहिली ते पाचवीच्या वर्गांची जबाबदारी असते. विषय शिक्षक म्हणून काम केलेल्या समाजशास्त्राच्या त्या शिक्षकांना आता पहिली ते पाचवीच्या वर्गांना शिकवावे लागणार आहे. त्याची कार्यवाही काही दिवसांत पूर्ण केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT