Chandrakant Khaire sandipan Bhumare Sakal
महाराष्ट्र बातम्या

"भुमरे हा तर गावठी मंत्री, मी त्याला सांभाळलं पण त्याला काहीच कळत नाही"

दत्ता लवांडे

औरंगाबाद : शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्या गटातील आमदारांमध्ये संदीपान भुमरे यांचा सामावेश होता. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच आमदार खैरे यांच्या निशाण्यावर राहिले आहेत. खैरे हा गावठी मंत्री असून त्याला काही कळत नाही असं वक्तव्य खैरे यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना केलं आहे.

(Chandrakant Khaire vs Sandipan Bhumare)

काल पैठण येथील एका स्थानिक कार्यक्रमात बोलताना संदीपान भुमरे यांनी शिवसेनेतील आणखी दोन आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. शिवसेनेच्या एकूण आमदार आणि खासदारांपैकी जास्तीत जास्त आमदार, खासदार आमच्या कडे आहेत. मग तुम्हीच सांगा खरी शिवसेना कुणाची? असं म्हणत पक्षाचे चिन्हही लवकरच आम्हाला मिळेल असंही ते बोलताना म्हणाले होते.

दरम्यान, मंत्री भुमरे यांनी केलेल्या दाव्यावर उत्तर देताना खैरे म्हणाले की, "संदीपान भुमरे हा तर गावठी मंत्री आहे, त्याला काही कळत नाही, तो काहीही बोलतो, त्याचा अभ्यास अजिबात नाहीये, मंत्रिपद कसं चालवायचं हेही त्याला कळत नाही, मी सुरूवातीपासून त्यांना सांभाळलं आहे. नशीबाने ते आमदार झाले आहेत. त्यामुळे आमच्या संपर्कात दोन आमदार आहेत असं बोलणं चुकीचं आहे. उलट शिंदे गटातीलच १० ते १५ आमदार आमच्या संपर्कात आहेत." अशा शब्दांत खैरे यांनी संदीपान भुमरे यांच्यावर टीका केली आहे.

"शिंदे गटातील काही आमदार सध्या अस्वस्थ आहेत. ते आता आम्हाला फोन करतात आणि आम्हाला म्हणतात की, साहेब आमचं चुकलं... आम्हाला माफ करा. असं जवळपास १० ते १५ जण त्यांना माहितीये की आपण फक्त ५० जण आहोत आणि भाजपवाले ११६ आहेत. ते कोणत्याही पक्षाचे आमदार फोडतील आणि त्यांचा कोटा पूर्ण करून आपल्याला आऊट करतील, त्यामुळे ते आमच्या संपर्कात आले आहेत." असं चंद्रकांत खैरे माध्यमाला बोलताना म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad News: पर्यटकांचा हिरमोड! देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हिणी घाट बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय

काय सांगता? यंदाच्या मान्सूनमध्ये चक्क 'ब्लॅक कार्बन'? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर...

Pune Property Tax : पुणे महापालिकेची विक्रमी मिळकतकर वसुली: पहिल्या तिमाहीत १३९५ कोटी, गेल्या वर्षीपेक्षा १०२ कोटींची वाढ

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

NCP Sharad Pawar Merger Rumours: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे चर्चेला शशिकांत शिंदेंचा ठाम विरोध

SCROLL FOR NEXT