Sangli Lok Sabha 2024 esakal
महाराष्ट्र बातम्या

Vishal Patil Sangli : सांगली काँग्रेसचीचं! संजय राऊत सांगलीत असताना विशाल पाटलांनी थोपटले दंड

Sangli Lok Sabha 2024: सांगली लोकसभेच्या जागेवर विशाल पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे ते सांगली लोकसभा जागेवर ठाम असल्याचे दिसते.

Sandip Kapde

Sangli Lok Sabha 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत बिघाडी पाहायला मिळत आहे. सांगलीच्या जागेवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

सांगली लोकसभा मतदार संघात ताणलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संजय राऊत सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली.  सांगलीतून चंद्रहार पाटील दिल्लीत जाणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. तर विशाल पाटील यांना भविष्यात संधी मिळेल. विशाल पाटील, विश्‍वजीत कदम महत्त्वाचे राजकीय कार्यकर्ते आहेत, असे राऊत म्हणाले.

मात्र विशाल पाटील बंड करण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसून येत आहे. विशाल पाटील यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विशाल पाटील म्हणाले, मागच्या काही वर्षात सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे. सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहेत. काँग्रेसनेच जिल्ह्यात विकास रुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणच तयार झालं आहे.

स्वर्गीय वसंतदादा पाटील, पतंगराव कदम साहेब, गुलाबराव पाटील साहेब, प्रकाशबापू पाटील, मदनभाऊ पाटील, आर आर पाटील, शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हे तुम्हाला ठावूकच आहे. त्यामुळे काँग्रेस आणि सांगलीचं अतुट नात तयार झालं आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. मला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय. शिवाय सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने सांगली काँग्रेसचीच या भूमिकेवर ठाम आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने विश्वजित कदम सर्व प्रयत्न करत असल्याचे विशाल पाटील म्हणाले. 

या आधीच्या काळात तुम्ही सर्व जण पक्षाच्या आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहात याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे तुमची खंबीर साथ अशीच सोबत राहो. आपणा सर्वांना विश्वास आहे कि, सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे. तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आतापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा. सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री आहे. आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही, तर जिंकायचा आहे, असे विशाल पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper Train Route नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर ट्रेन'चा मार्ग झाला जाहीर!

School Rules: शिक्षकांना करता येणार नाही विद्यार्थ्यांच्या रील, शिक्षण विभागाची नवी नियमावली

Latest Marathi News Live Update : पुण्यातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अजित पवारांच्या विरोधात बॅनरबाजी

Nashik Municipal Election : सिडकोत निकालाचा थरार! भाजपचे दुबार एबी फॉर्म प्रकरण गाजले; ५ जणांची उमेदवारी फेटाळली

Car Launch in 2026 : एकच झलक, सबसे अलग! 2026 वर्षांत लॉंच होणार 10 ब्रॅंड कार; परवडणारी किंमत अन् दमदार फीचर्स

SCROLL FOR NEXT