MD Drugs 
महाराष्ट्र बातम्या

MD Drugs : सांगलीत एमडी ड्रग्जचं मोठं घबाड पोलिसांच्या हाती? 'या' गावात सुरु होता कारखाना...

MD Drug Sangli Connection : सांगलीतल्या इरळी गावामध्ये मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारला आहे. या गावामध्ये एमडी ड्रग्जचं कनेक्शन असल्याचा पोलिसांना संशय आहे. याबाबत अधिकृत माहिती समजलेली नाही.

सकाळ डिजिटल टीम

MD Drug Sangli Connection : सांगलीतल्या इरळी गावामध्ये मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारला आहे. या गावामध्ये एमडी ड्रग्जचं कनेक्शन असल्याचा पोलिसांना संशय आहे. याबाबत अधिकृत माहिती समजलेली नाही.

सांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळ तालुक्यातील इरळी गावामध्ये रविवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला. मुंबई पोलिलसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याची माहिती आहे. गावामध्ये एमडी ड्रग्ज बनवलं जात असल्याचा संशय असून येथे मोठा कारखाना असल्याचाही सुगावा पोलिसांना लागल्याचं सांगितलं जात आहं. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.

या कारवाईबाबत पोलिसांना मोठी गोपनीयता बाळगली आहे. सांगलीमध्ये यापूर्वीदेखील ड्रग्जशी संबंधित ठिकाणांवर पोलिसांनी छापेमारी केली होती. आता पुन्हा एकदा ड्रग्जचं सांगली कनेक्शन पुढे आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मागच्या काही महिन्यांपासून पुणे आणि परिसरात ड्रग्जचे साठे सापडत आहेत. त्यामुळे देशभरातील ड्रग्जचं कनेक्शन पुढे आलेलं होतं. यात हजारो कोटी रुपयांचं ड्रग्ज पोलिसांना मिळून आलेलं. आता पुन्हा सांगली कनेक्शन पुढे आल्याने तिथे किती साठा सापडतो, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेत चेंबरमध्ये का बसतात? सभागृहात का गेले नाहीत? अमित शहांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : घाटकोपर दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू, अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली

माधुरी दीक्षित करणार 'कोण होणार करोडपती'चं होस्टिंग; श्रीराम नेनेंनी पाच शब्दात केलं बायकोचं कौतुक ; म्हणाले-

Maharashtra education officer transfers : बदल्यांचे सत्र सुरूच; १३ परिवीक्षाधीन शिक्षणाधिकाऱ्यांना स्वतंत्र पदभार, ठाणे पालिकेवर कोल्हापूरच्या ओंकार बजागेंची नियुक्ती

Sindhudurg: तिरोडा-नाणोस नवीन बांधलेल्या पुलाला तडे, धोकादायक भागात लावले बॅरेल, एकेरी वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT