Sanjay Nirupam Resign Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Nirupam Resign: काल पक्षाकडून हकालपट्टी, तर आज संजय निरुपम यांनी दिला काँग्रेस पक्षाचा राजीनामा

Sanjay Nirupam Resign: काल पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर आज काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी यासंबधीची पोस्ट सोशल मिडीयीवर शेअर केली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Sanjay Nirupam Resign: देशासह राज्यात लोकसभा निवडणुकींची जोरदार तयारी सुरू असतानाच काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. काल पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर आज काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी यासंबधीची पोस्ट सोशल मिडीयीवर शेअर केली आहे. त्यामुळे आता पुढे संजय निरुपम काय भूमिका घेणार? हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, संजय निरुपम यांची काल काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. 6 वर्षांसाठी हकालपट्टी होत असल्याचं के सी वेणुगोपाल यांनी जाहीर केलं. महाराष्ट्र काँग्रेसने त्यांच्या हकालपट्टीची शिफारस केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे

उत्तर पश्चिम मुंबईतून तिकीट न मिळाल्याने संतापलेल्या निरुपम यांनी एकीकडे काँग्रेसला अल्टिमेटम दिला होता, तर दुसरीकडे काँग्रेस पक्षानेही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. काँग्रेसनेही त्यांच्या स्टारच्या यादीतून त्यांचे नाव देखील काढून टाकले आहे.

का झाली कारवाई?

शिवसेनेसोबत (UBT) जागावाटपाच्या मुद्द्यावर त्यांनी केलेल्या टिप्पणीवरून काँग्रेसने ही कारवाई केली होती. दरम्यान स्टार प्रचारकाच्या यादीतून काढल्यावर त्यांनी थेट काँग्रेसवर टीका केली होती. त्यामुळे त्यांची 6 वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात संजय निरुपम भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरु होती. अशातच आता लवकरच ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करु शकतात, अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नव्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आज त्यांनी त्यांचा राजीनामा सादर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिला सामना १३ ऐवजी १४ सप्टेंबरला? पोलिसांच्या पत्रानंतर काय निर्णय झाला? महत्त्वाच्या अपडेट्स

Marathi News Live Updates : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला

केंद्राचा आदेश पण कर्नाटक भूमिकेवर ठाम! काँग्रेसच्या १९३७ सालच्या ठरावाचं होणार पालन, DK सरकारचा आदेश नेमका काय?

Bail Pola Festival : जात-पात विसरून एकाच माळेत; अमळनेर वस्तीत हिंदू-मुस्लिम बांधवांचा बैलपोळा उत्साहात

MPSC paper leak confession : व्यवस्था कुठेतरी भ्रष्ट आहे, हे आम्हीही मान्य करतो ; आमदार विक्रम पाचपुते यांची स्पष्टोक्ती

SCROLL FOR NEXT