sanjay nirupam  sakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Nirupam : ''माझी घरवापसी होतेय, तीस वर्षांनंतर पुन्हा शिवसेनेत...'', संजय निरुपम यांचा पक्षप्रवेश ठरला

''बाळासाहेब भवन येथे मुख्यमंत्र्यांनी बोलावल्यानंतर त्यांना भेटायला आलो होते. पुढे काय करायचं याच्यावर आमच्यामध्ये विस्तृत चर्चा झाली आहे. परवा तीन ते चार वाजता माझा शिवसेनेत प्रवेश होईल. बाकीची माहिती पक्षाकडून समजेल.''

संतोष कानडे

मुंबईः पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते संजय निरुपम हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. स्वतः त्यांनी याबाबत माहिती दिली. परवा त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होईल. एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर निरुपम यांनी माध्यमांना ही माहिती दिली.

बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय निरुपम यांना भेटण्यासाठी बाळासाहेब भवन येथे बोलावले होते. उभय नेत्यांमध्ये पक्ष प्रवेशासंबंधी चर्चा झाली. त्यानंतर संजय निरुपम यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

संजय निरुपम म्हणाले की, बाळासाहेब भवन येथे मुख्यमंत्र्यांनी बोलावल्यानंतर त्यांना भेटायला आलो होते. पुढे काय करायचं याच्यावर आमच्यामध्ये विस्तृत चर्चा झाली आहे. परवा तीन ते चार वाजता माझा शिवसेनेत प्रवेश होईल. बाकीची माहिती पक्षाकडून समजेल.

''आमच्या भेटीमध्ये पुढे कसं काम करायचं यासंबंधी चर्चा झाली. परवा सगळ्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश करेन.. पक्षाच्या सगळ्या उमेदवारांचा मी प्रचार करणार असून तीस वर्षांनंतर पुन्हा मी माझ्या पक्षात प्रवेश करत आहे, याचा अनंद आहे.'' असं निरुपम म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT