Sanjay Randhir made world cup from gold nashik news  
महाराष्ट्र बातम्या

World Cup 2023: चक्‍क साकारले सोन्‍याचे चमचमते विश्‍वकरंडक! संजय रणधीर यांची कर्तबगारी

सकाळ वृत्तसेवा

World Cup 2023 : विश्‍वकरंडकाचा माहोल सर्वत्र पाहायला मिळत असून, संपूर्ण देश क्रिकेटच्‍या रंगात रंगला आहे. अशात नाशिकच्‍या संजय बाजीराव रणधीर यांनी चक्‍क सोन्‍याचे चमचमते विश्‍वकरंडक साकारले. ०.०८ मिलिमीटर आणि १.७ सेंटिमीटर आकाराचे असे दोन विश्‍वकरंडक त्‍यांनी सोन्‍यापासून साकारले आहेत.

भारतीय संघ विजेता ठरल्‍यास हे विश्‍वकरंडक कर्णधार रोहित शर्मा आणि फलंदाज विराट कोहली यांना भेट स्वरूपात देण्याचा मानस त्‍यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्‍यक्‍त केला. (Sanjay Randhir made world cup from gold nashik news )

क्रीडाप्रेमींबरोबर सर्वच भारतीयांमध्ये सध्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेबाबत उत्‍साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रविवारी (ता. १९) भारत विरुद्ध ऑस्‍ट्रेलिया यांच्‍यातील अंतिम लढत पाहताना भारताच्‍या विजयाचा जल्‍लोष करण्याचा बेत नाशिककरांनी आखला.

यानिमित्त कुठे विश्‍वकरंडकाच्‍या आकाराचा केक साकारला जातो आहे; तर काही हॉटेल्समध्ये या आकाराची सजावट केली जात आहे. पण, सर्वांच्‍या आकर्षणाचा केंद्र असलेला सोन्‍यापासून चक्‍क विश्‍वकरंडक साकारण्याची किमया नाशिकच्‍या संजय रणधीर यांनी केली. उद्योजक असलेले रणधीर हे यापूर्वी सराफी व्‍यवसायात कार्यरत होते.

या क्षेत्रातील त्‍यांना २० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव होता. सध्या ते कारखाना चालवत असून, विश्‍वकरंडकानिमित्त निर्माण झालेला माहोल पाहता, थेट सोन्‍याचा विश्‍वकरंडक बनविण्याची संकल्‍पना त्‍यांना सुचली.

लागलीच या संकल्‍पनेला मूर्तरूप देताना त्‍यांनी एक नव्‍हे, तर दोन विश्‍वकरंडक सोन्‍यापासून साकारले. यापूर्वी त्‍यांनी एक मिली ते एक ग्रॅमपर्यंतच्या मायक्रो गणेशमूर्ती साकारल्या आहेत.

असे आहेत विश्वकरंडक...

रणधीर यांनी साकारलेला छोट्या आकाराचा ०.०८ मिलिमीटरचा विश्‍वकरंडक साकारण्यासाठी १५ मिलिग्रॅम सोन्‍याचा वापर केला. त्‍यापेक्षा आकाराने थोडा १.७ सेंटिमीटर आकाराची मोठी असलेली विश्‍वकरंडकाची दुसरी प्रतिकृती त्‍यांनी ५४० मिलिग्रॅम सोन्‍याचा वापर करून साकारली आहे.

"सध्या सगळीकडे विश्‍वकरंडकाचे वातावरण असल्‍याने सोन्‍यापासून विश्‍वकरंडकाची प्रतिकृती बनविण्याची संकल्‍पना सुचली. भारतीय संघ विजयी झाल्‍यास कर्णधार रोहित शर्मा आणि फलंदाज विराट कोहली यांची भेट घेत त्‍यांना विश्‍वकरंडक भेट स्वरूपात देण्याची इच्‍छा आहे." - संजय रणधीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसानंतर अपघात झाल्याचं आलं समोर

Kolhapur circuit bench: १० वर्षांहून अधिक खुर्चीला चिकटून बसलेले संचालक जाणार घरला! २६ बँकांमधील संचालकांनी भितीने घेतली सर्किट बेंचमध्ये धाव

Latest Marathi News Update LIVE : शितल तेजवानी पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल

Cricket Record: सचिन तेंडुलकर, विराट कोहली, पाँटिंगलाही न जमलेला विश्वविक्रम विंडिजच्या होपने करून दाखवला; धोनीशीही बरोबरी

Diamond Found 300 kg : अन्नाला महाग असलेल्या देशात सापडला ३०० किलोचा हिरा, राष्ट्रपतींचा तातडीचा निर्णय चर्चेत

SCROLL FOR NEXT