Sanjay Raut accused the government in the Rajya Sabha of abusing the law  e sakal
महाराष्ट्र बातम्या

कायद्याचा दुरुपयोग होतोय; ED च्या कारवाईनंतर राऊतांचा राज्यसभेत आरोप

सकाळ डिजिटल टीम

संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. ईडीच्या फेऱ्यात अडकलेल्या संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मुलाने आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा केलेल्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. या दोन्ही नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचा संजय राऊत यांनी राज्यसभेत केला आहे.

संजय राऊत राज्यसभेत बोलताना म्हणाले की, "संविधानात म्हटलंय की कुणालाही त्याच्या इच्छेविरोधात साक्ष देण्यासाठी भाग पाडले जाऊ शकत नाही कलम २० च्या नुसार प्रत्येक नागरिकाला गप्प बसण्याचा आधिकार आहे,कोणालाही त्याच्या इच्छेविरोधात साक्ष देण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही नार्को ब्रेम मॅपिंग अशा इतर कोणत्याही सायंटीफिक टेस्ट केली जाऊ शकत नाही यामुळे २०१० मध्ये सुप्रिम कोर्टाने नार्को टेस्टला देखील बेकयदेशीर म्हटले'

ते पुढे म्हणाला की, "मी गृहमंत्र्यांचा आभारी आहे. कायद्याचा गैरवापर होणार नाही असे गृहमंत्र्यांनी लोकसभेत सांगितलं होतं, पण तुम्ही डोळ्यात डोळे घालून म्हणू शकाता का की कायद्याचा गैरवापर होत नाहीये." असा सवाल देखील त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केला आहे.

यापुर्वी ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची अलिबागमधील मालमत्ता जप्त केली होती, त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढल्या होत्या. ईडीने १ हजार ४८ कोटींच्या प्रविण राऊत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली असून अलिबागजवळील किहीमधील ८ भूखंड जप्त करण्यात आले आहेत. प्रविण राऊत हे संजय राऊतांचे स्नेही आहेत. तसेच मुंबईतील एक फ्लॅट देखील जप्त करण्यात आला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT