sanjay raut-devendra fadnavis google
महाराष्ट्र बातम्या

सोमय्यांवर टीका पण फडणवीसांवर विश्वास; पाहा राऊत काय म्हणाले?

राऊतांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण...

सुधीर काकडे

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये (BJP) जोरदार खडाजंगी पाहायला मिळतेय. मात्र या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांनी एकमेकांवर आरोपांची राळ उठवली आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेल्या आरोपांनंतर आता राऊतांनी देखील त्यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. तसंच कोठडीचं सॅनिटायझेशन सुरू असून लवकरच सोमय्या पिता पुत्रांची कोठडीत रवानगी होईल असं राऊत यांनी म्हटलं आहे. मात्र संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) विश्वास असल्याचं बोलून दाखवलं.

सोमय्यांनी तब्बल ४०० कोटींपेक्षा मोठा घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. पुनर्वसनाच्या नावाखाली ३८ एकरचा भूखंड घोटाळा करून ४३३ बोगस लोकांना त्यात घुसवलं. ज्यांचा त्यावर अधिकार नाही, एजंटचा वापर करून घोटाळा केला. माझ्याकडे याची कागदपत्रे आहेत. त्यांना धमक्या देण्यात आल्या. ४३३ लोकांकडून २५-२५ लाख रुपये एजंटमार्फत घेतल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला. मात्र यावेळी बोलताना संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर विश्वास असल्याचं दाखवलं. राऊत म्हणाले, फडणवीसांच्या नावाने सोमय्याने पैसे गोळा केले. मी पुन्हा सांगतो की, देवेंद्र फडणवीस हे असं करतील असं आम्हाला वाटत नाही असं राऊत म्हणाले.

राऊत यावेळी बोलताना म्हणाले की, फडणवीसांकडून असं होणार नाही असा आम्हाला विश्वास आहे, मात्र सोमय्यांनी ईडीसोबतच त्यांनी फडणवीसांच्या नावावर, थेट अमित शहांच्या आणि केंद्रीय मंत्र्यांच्या नावावर पैसे गोळा केले. तसंच पत्रकारांनी जेव्हा त्यांनी विचारलं की, फडणवीसांना हे माहितीये असं तुम्हाला वाटतं का? त्यावर राऊत म्हणाले, आम्हाला वाटत नाही की फडणवीसांना या गोष्टींची कल्पना आहे. तसंच या सर्व प्रकरणांमध्ये सोमय्यांनी तब्बल साडे सात हजार कोटी जमा केल्याचा आरोप त्यांनी केला.

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हा विश्वास व्यक्त करून ते नेमकं काय साध्य करू पाहातायेत हे आता येणाऱ्या काळात समजणार आहे. शक्यता अशीही आहे की, किरीट सोमय्यांना भाजपचा पाठिंबाच नाही असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न संजय राऊत करत आहेत. मात्र काल थेट केंद्रीय मंत्री नारायण राणेंनीच राऊतांवर आरोप केल्याने संपूर्ण भाजप संजय राऊतांच्या विरोधात असल्याचं चित्र निर्माण झालंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: भाजपच्या मोर्चात गिरीश महाजनांना महिलेनं झापलं? आता तिनेच सांगितलं सत्य; म्हणाली- माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून...

Nashik News: धर्मांतर व बलात्कार प्रकरण गंभीर; फरार निदा खानचा जामीन अर्ज न्यायालयाने नाकारला, नाशिक सत्र न्यायालयाचा निर्णय!

Sangli Yerala River Drowning : येरळा नदीत ८ जण बुडाले, एका तरुणीचा मृत्यू; पोहण्याचा मोह ठरला जिवघेणा

Mumbai Pune Expressway: दोन्ही मार्ग अखेर वाहतुकीसाठी खुले; ‘मिसिंग लिंक’ची ‘मुंबई लेन’ सकाळी बंद अन् दुपारी दिलासा, वाहनचालकांना मनस्ताप!

Perfect Sunday Breakfast: झटपट बनवा कुरकुरीत आणि हेल्दी 'रवा टोस्ट', रविवारच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट

SCROLL FOR NEXT