Chandrakant Patil-Sanjay Raut e sakal
महाराष्ट्र बातम्या

Political : राऊत, परबांविरुद्ध चंद्रकांत पाटील याचिका दाखल करणार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील; आमदार निलंबनप्रकरणी अवमानकारक वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

गारगोटी (कोल्हापूर) : भाजप आमदारांचे केलेले निलंबन घटनाबाह्य असल्याने सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले आहे. याप्रश्नी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) व परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात वक्तव्य केले असून त्यांच्याविरोधात अवमानकारक याचिका दाखल करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. खानापूर येथे एका कार्यक्रमानिमित्त ते आले होते.

ते म्हणाल, ‘‘गतवर्षी जुलै महिन्यात तालिका अध्यक्षांशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत भाजपच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन केले होते. सर्वोच्च न्यायालयाने आता त्यांना न्याय दिला आहे. आमदार म्हणून कर्तव्य बजावण्याचा अधिकार त्यांना बहाल केला आहे. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत व परिवहन मंत्री अनिल परब सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात वक्तव्य करून न्यायालयाचा अवमान करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडे संपूर्ण देश आदराने पाहत असताना ते चुकीचे वक्तव्य करीत असून न्यायालयाचा अवमान केल्याच्या कारणावरून त्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली जाईल.’’

या वेळी राज्य शासनाच्या दुकानात वाईन विक्रीबाबत निर्णयावर पाटील यांनी कडाडून टीका केली. तरुण पिढी बरबाद करणारा हा शासनाचा निर्णय असून राज्य सरकार लोकांची दिशाभूल करीत आहे. यामागचे गुपित लवकरच उघड होईल असे सांगत भविष्यात रेशनधान्य दुकानातसुद्धा दारू विक्री करायचा शासन निर्णय घेऊन जनतेला देशोधडीला लावेल असा आरोप त्यांनी केला. भाजपचे संघटनमंत्री नाथाजी पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रविणसिंह सावंत, पार्थ सावंत, सुशांत मगदूम आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT