Kirit Somaiya Sanjay Raut Sakal Digital
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut Arrested: सोमय्या म्हणाले, 'अनेकांना धमकी देणारे आज..'

सकाळ डिजिटल टीम

Sanjay Raut Arrested Kirit Somaiya Reaction

मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पातील गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) संजय राऊत यांना अटक केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिलीये. सत्यमेव जयते असं म्हणतानाच सोमय्यांनी राऊतांवर निशाणाही साधलाय.

गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा करत ईडीने रविवारी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना अटक केली. गेल्या अडीच वर्षात राऊत यांनी सातत्याने भाजपावर टीकेची झोड उठवली होती. नरेंद्र मोदींपासून ते राज्यातील भाजपा नेत्यांचा राऊत ‘सामना’च्या संपादकीयमधून समाचार घेत होते. आता ईडीने अटक केल्यावर किरीट सोमय्यांनी ट्विट केलंय. ‘अनेकांना जेलमध्ये टाकण्याची धमकी देणारे संजय राऊत आज स्वत:च जेलमध्ये आहेत. सत्यमेव जयते’ असे सोमय्यांनी म्हटलंय.

भाजपाचे मुंबईतील नेते मोहित कंबोज यांनी देखील ट्विट केलंय. त्यांनी जेवणाच्या डब्याचा फोटो ट्विट करत राऊत यांना चिमटा काढलाय. संध्याकाळी राऊत यांच्यावरील कारवाईचं समर्थन करताना कंबोज म्हणाले होते, संजय राऊतांना अटक झालीये. नवाब मलिक, संजय पांडे आणि आता संजय राऊत. पुढचा नंबर कोणाचा?

रविवारी सकाळी ईडीचे पथक संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि राऊत यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली. दिवसभर राज्याच्या राजकारणात राऊत यांच्यावरील कारवाईचे पडसाद उमटत होते. भाजपाच्या नेत्यांनी कारवाईचे समर्थन केले होते. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राऊतांवरील कारवाईवर प्रतिक्रिया देताना कोणत्याही पुराव्याशिवाय ईडी कुणालाही ईडी ताब्यात घेत नाही. न्यायालयासमोर ईडीला पुरावे सादर करावे लागतात, असे सांगितले होते. गुवाहाटीहून आमचा मृतदेह आणण्याबाबत बोलणारी व्यक्ती आज अस्वस्थ आहे. भगवान के घर देर है अंधेर नहीं, जैसी करनी वैसी भरनी, असं आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं होते.

नवनीत राणा म्हणाल्या, ही कारवाई आधीच व्हायला पाहिजे होती. पत्रकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या संजय राऊत यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले? संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी पदाचा दुरुपयोग केला. संजय राऊत भ्रष्टाचारी आहेत. या अगोदरच त्यांना अटक करायला हवी होती.

रविवारी रात्री उशिरा संजय राऊतांना अटक झाल्यानंतर शिवसेना सोमवारी आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. राऊत यांना सोमवारी सकाळी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT