raut modi esakal
महाराष्ट्र बातम्या

संजय राऊतांना लसीकरणाच्या 100 कोटींच्या आकड्याबद्दल शंका!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : "जे बड्या देशांना जमलं नाही ते भारतानं करुन दाखवलं, मोहिमेला यश आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सांगितलं. कोरोना प्रतिबंधक लसीकरण (corona vaccination) मोहिमेत 100 कोटींचा टप्पा आज पूर्ण केला, त्याचं जगभरातून कौतुक करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे शिवसेनेने या १०० कोटींच्या आकड्याबद्दल शंका उपस्थित केलीय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (shivsena mp sanjay raut) यांनी मोदी भाषण देत असतानाच यासंदर्भात आज वक्तव्य केलं आहे.

संजय राऊतांना लसीकरणाच्या 100 कोटींच्या आकड्याबद्दल शंका!

कोरोना प्रतिबंधक लसीकरण (corona vaccination) मोहिमेत १०० कोटी लसींच्या डोसचा टप्पा पार करून भारताने गुरुवारी नवा विक्रम नोंदवला. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित केलं. इतिहासाचा नवा अध्याय लिहिला जात आहे असं मोदी म्हणाले. मात्र दुसरीकडे शिवसेनेने या १०० कोटींच्या आकड्याबद्दल शंका उपस्थित केलीय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी भाषण देत असतानाच यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

100 कोटी डोस खरोखर पूर्ण झाले आहेत का?, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित करतानाच, “झाले असतील तर आनंदच आहे,” असं म्हटलंय. तसेच पुढे बोलताना राऊत यांनी, “डोस देण्याच्या बाबतीत आपला देश जगात १९ व्या स्थानी आहे. काहीजणं म्हणतायत ३३ कोटीच दोन डोस झालेत. तर काहींना दुसरा डोस मिळालाच नाहीय,” असंही म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! आता हार्बर मार्गावरही धावणार १५ डब्यांची लोकल, 'या' स्थानकात मोठे बदल; वाचा सविस्तर

Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं! रिझर्व्ह बँकेने ठोठावला 7 लाखांचा दंड; संचालकांच्या संस्थांना नियमबाह्य कर्जवाटप भोवलं

हा ट्रेक नव्हता... निसर्गाशी झालेली जिवंत झुंज होती! लोणावळा ते भीमाशंकर ट्रेकचा अनुभव

Latest Marathi News Live Update : ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरले

Jalgaon ACB Action : 'कॅल्क्युलेटर बाबा'च्या कार्यालयावर धाड! शेतजमीन मोजणीसाठी लाच घेताना 'भूमिअभिलेख'मधील दोघांना रंगेहाथ पकडले; जळगावातील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT