Sanjay Raut bail ED filed revised petition in Bombay High Court for cancellation of bail of Sanjay Raut  Sakal Digital
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut Bail : संजय राऊतांच्या मागचं शुक्लकाष्ट संपेना! आता ईडीने दाखल केली सुधारित याचिका

सकाळ डिजिटल टीम

पत्रा चाळ घोटाळाप्रकरणात नुकतेच तुरुंगातूनबाहेर आलेले उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना मिळालेल्या जामीनाविरोधात ईडीकडून हायकोर्टात सुधारीत याचिका दाखल करण्यात आली आहे.

खासदार संजय राऊत यांचा जामीन रद्द करावा यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे, तसेच या याचिकेवर २५ नोव्हेंबरला यावर सुनावणी होणार आहे.

मुंबई हायकोर्टात ईडीने ही सुधारित याचिका दाखल केली आहे, मागच्या वेळी न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे ईडेनी याचिका दाखल केली होती, त्यामध्ये काही सुधारणा करून याचिका दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर ही नवीन याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यामुळे २५ नोव्हेंबरच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय होतं याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय राऊत यांना सत्र न्यायालयाने जामीन दिला होता. त्यानंतर ईडीने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती, त्यानंतर तात्काळ सुनावणी होऊ शकली नव्हती. त्यामुळे राऊत तुरुंगातून बाहेर आले, तेव्हापासून ईडीकडून जामीन रद्द व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

हेही वाचा - Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT