Sanjay Raut and Kirit Somaiya टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : किरीट सोमय्या मराठी द्वेष्टा; राऊतांचा घाणाघात

मराठी माणूस बेईमान नाही, शिवसेना घाबरणार नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या मराठी भाषा द्वेष्टा माणूस असल्याचा घाणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सोमय्या हा माणूस मराठी द्वेष्टा असून, सोमय्यांनीच मुंबईतील शाळांमध्ये मराठी सक्ती केल्यानंतर कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते, असा आरोप राऊत यांनी केला आहे. त्यामुळे हे सर्व कऱण्यापूर्वी सोमय्यांचे तोंड बंद करण्याचे गरजेचे असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. मराठी भाषेचा द्वेष करणाऱ्या सोमय्या सारख्या व्यक्तीकडून आपण अजून काय अपेक्षा करणार असे म्हणत राऊत यांनी सोमय्या यांचा चांगलाच समाचार घेतला. ते मुंबईमध्ये शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत आहेत.

तत्पूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रावर ज्या पद्धतीने आक्रमण सुरु आहे त्याविरोधात कुणीतरी रणशिंग फुंकायला हवं होतं ते आम्ही शिवसेनेच्या वास्तुतुन फुंकतोय, असे विधाना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. मराठी माणूस बेईमान नाही आणि तुम्ही कितीही नामर्दानगी करून वार केलेत तरी शिवसेना घाबरणार नाही यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले. (Sanjay Raut Allegations on Kirit Somaiya in Press Conference)

राऊत म्हणाले की, बाळासाहेबांनी मंत्र दिला होता तो आयुष्यभरासाठी असून, तु काही पाप केलं नसेल, गुन्हा केले नसेल तर, तुमचं मन साफ आहे कुणाच्या बापाला घाबरू नका असे ते नेहमी म्हणायचे असे राऊत यांनी यावेळी सांगितले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसुद्धा याच पद्धतीने पक्षाला पुढे घेऊन जातायेत असे राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Hasan Mushrif : 'हसन मुश्रीफ हतबल, महायुतीत आताच डोकीफुटत आहेत'; सतेज पाटील यांची टीका, गोकुळ निवडणुकीवरून राजकारण तापलं

Raju Shetti: १५ ऑक्टोबरला कारखान्यांची धुराडी पेटल्यास संघर्ष; राजू शेट्टींचा इशारा, हुबळीत केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार

४० पैशांनी जीव जाणार नाही, प्रत्येक गोष्टीवर कर दिला पाहिजे; UPI शुल्कावर नीति आयोगाच्या उपाध्यक्षांचं विधान, सांगितली चाणक्यनीति

Kagal Municipal Council : कागल नगरपरिषदेतील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; हसन मुश्रीफ, समरजित घाटगेंच्या कारभारावर सवाल, कर्मचाऱ्यांचा ठिय्या

Gold Rate Today: अमेरिकेच्या एका निर्णयाने सोनं स्वस्त! महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती? सोन्याच्या दरात आणखी घसरण होणार?

SCROLL FOR NEXT