sanjay raut on goa election sanjay raut
महाराष्ट्र बातम्या

उत्पल पर्रीकरांना भाजपनं तिकीट दिलं तर सेना पाठिंबा देईल का? राऊत म्हणतात...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) दिवंगत नेते मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचा मुलगा स्वतंत्र लढत असेल तर इतर पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते. आम्ही उत्पल पर्रीकर यांना तिकीट दिलं तर शिवसेना पाठिंबा देईल का? असा प्रश्न भाजपकडून विचारण्यात आला होता. त्यालाच आता संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे.

गोव्यात मनोहर पर्रीकर यांचं मोठ काम आहे. गोव्यात भाजप हे पर्रीकरांच्या नावाने ओळखले जाते. तेच लोक आज त्यांचा मुलगा उत्पल पर्रीकरांची लायकी काढतात. त्यांच्या मुलाचा अपमान करतात. भाजप पणजीतून ड्रग्स माफियांना तिकीट देत आहे. पण, पर्रीकरांच्या मुलांचा अपमान करत आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.

भाजपने उमेदवारी दिली तर शिवसेना पाठिंबा देईल का? या भाजपच्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले, '' भाजपने आधी उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी द्यायला पाहिजे. तिकीट देऊ असं बोलायला इतका वेळ का लागला? जे बोलतात तिकीट देऊ त्यांनी कधीच दिलं असतं किंवा नाकारलं असतं. पण, तिकीट कोणाला द्यायचं हे त्यांच्या हातात नाही. त्यांनी उत्पल पर्रीकर यांचं तिकीट का थांबवलं आहे?'' असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

उत्पल पर्रीकरांना पाठिंबा का द्यावा असं का म्हटलं? -

उत्पल पर्रीकर हे गोवा विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढणार असतील तर भाजप वगळून सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव संजय राऊतांनी तृणमूल काँग्रेस, आप आणि गोवा फॉरवर्ड पार्टी या तिन्ही पक्षांसमोर प्रस्ताव ठेवला. पण, त्यांनी असं का केलं? असा प्रश्न विचारला असता, एखाद्या नेत्याबद्दल सहानुभूती असते. तशी मनोहर पर्रीकर यांच्याबद्दल आहे. त्याच सहानुभूतीपोटी बोललो असल्याचे संजय राऊत म्हणाले. तसेच गोवा अत्यंत लहान राज्य आहे. त्यामुळे गोव्यात कोणालाच बहुमत मिळणार नाही, असंही राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT