Sanjay-Raut
Sanjay-Raut eSakal
महाराष्ट्र

उत्पल पर्रिकरांचा अपमान गोव्याची जनता कधीच विसरणार नाही - राऊत

सकाळ डिजिटल टीम

उत्पल पर्रीकर यांना पक्ष सोडताना वेदना देण्याचं काम भाजपाने केलं आहे.

सध्या देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणूकांचे वारे वाहत आहे. असे असले तरी सध्या गोव्याच्या राजकीय वातावरणात अनेक घडामोडी घडत आहे. यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने (BJP) गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ३४ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना तिकीट देण्यात आलं नाही, दरम्यान आता उत्पल पर्रिकर हे पणजी येथून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

ते म्हणतात, उत्पल पर्रिकर यांची वेदना मी समजू शकतो. उत्पल पर्रिकर यांना पक्ष सोडताना वेदना देण्याचं काम भाजपान केलं आहे. पक्ष सोडताना त्यांचा अपमान झाला आहे. उत्पल पर्रिकर यांचा हा अपमान गोव्याची जनता कधीही विसरणार नाही. दिवंगत नेते मनोहर पर्रीकरांनी ज्या जागेचे नेतृत्व केलं होतं, त्या जागेवर भाजपाकडून भ्रष्टाचारी व्यक्तीला तिकीट देण्यात आलं आहे. पर्रीकर यांनी देशात गोव्याचं नेतृत्व केलं होतं. लक्ष्मीकांत पार्सेकर यांना उमेदवारी नाकारनं भाजपला महागात पडेल. गोव्याचे डिपॉझिट जप्त झाले तरी लढा सुरु ठेवणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. यावेळी त्यांनी कॉंग्रसेलाही टोमणा दिला. काँग्रेसला मदत देण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले परंतु त्यांना कळत नाही. काँग्रेसला इतका विश्वास कुठून येतो? असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, दिल्लीत सत्तेत असलेला आम आदमी पक्षाने (APP) गोव्याच्या राजकारणात पाऊल ठेवले निवडणूकीची जोरदार तयारी सुरु केली आहे, उत्पल आपमध्ये आल्यास त्यांचं स्वागत आहे, अशी खुली ऑफर केजरीवालांनी दिली होती मात्र ती ऑफर नाकारुन उत्पल यांनी पणजी मतदार संघातून अपक्ष उमेद्वार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.(Utpal Parrikar News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT