sanjay raut says in shiv sena 56th anniversary 
महाराष्ट्र बातम्या

तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है - राऊत

तेरा गम तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही खानदानी है, खासदार राऊतांचा भाजपला टोला

सकाळ डिजिटल टीम

तेरा गम तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही खानदानी है, खासदार राऊतांचा भाजपला टोला

'तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है' असं वक्कव्य करत शिवसेना खासदार राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस कटकारस्थान करून राज्य चालवता येत नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे. आज शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने या सोहळ्यात बोलत असताना त्यांनी केंद्रावर आणि राज्यातील भाजपावर निशाणा साधला आहे. (sanjay raut says in shiv sena 56th anniversary)

ते म्हणाले, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे बाप होते. आजचा दिवस पवित्र आहे. शिवसेनेची स्थापना ही एका अग्नीतून झाली आहे. त्यामुळे हिंदुत्वावर शिवसेनेला कुणाचेही मार्गदर्शन नको आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाची ठिणगी पेटवली मुंबईतील या ठिणगीचा देशभर वनवा झाला. त्यामुळे हिंदुत्वाचे धडे सेनेला शिकवण्याची गरज नाही. अब तक 56 पुढेही सुरूच राहणार आहे. विरोधकांना घमेंड आली आहे. राज्याची सूत्र उद्धव ठाकरेंकडे राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पुढे ते म्हणाले, कटकारस्थान करून राज्य चालवता येत नाही. अग्निपथ योजना हा केंद्र सरकारचा मुर्खपणा आहे. कोणत्याही केंद्रीय संस्थाना आम्ही घाबरत नाही. सीबीआय, ईडी यांची भिती दाखवू नका. अंगावर आलात तर शिंगावर घेतले जाणार नाही तर तुडवले जाल असा घणाघातही राऊतांनी केला आहे. अयोध्येतील मंत्री आदित्य ठाकरे यांचं स्वागत हे बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचे होते. शिवसेना भक्कम पायावर उभी आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संपत्ती कशी वाढली? शिंदेंचे मंत्री शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस, अडचणीत वाढ

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पिकांनी नेसला हिरवा शालू, मशागतीच्या कामांना वेग

अरे हा तर डिट्टो कॉपी! गुजराती चित्रपटाने कॉपी केली मुक्ता बर्वेच्या गाजलेल्या सिनेमाची कथा? ट्रेलर पाहून नेटकरी म्हणतात-

Success Story: केडगावचा अनुज पितळे पहिल्याच प्रयत्नात सीए झाला!

Success Story : २२ व्या वर्षी 'सीए'; प्रणवकडून इच्छाशक्तीला प्रामाणिकपणे कष्टाची जोड

SCROLL FOR NEXT