Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

राणांना सुरक्षा का दिली? राऊत म्हणाले, खासगीत सांगतो

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधानांच्या दौऱ्याचं कारण सांगून त्यांनी पळ काढला, अशा शब्दात राऊतांनी राणांवर टीकेचा बाण सोडला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा हट्ट अखेर आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी सोडलाय. त्यानंतर लगोलग शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन राणा दाम्पत्यावर हल्ला चढवलाय.

पंतप्रधानांच्या दौऱ्याचं कारण सांगून त्यांनी पळ काढला, शेपूट घातलं, अशा शब्दात त्यांनी राणांवर टीकेचा बाण सोडला. तसंच श्रीरामाचं नाव घेण्यासाठी या बबलीचा विरोध होता आणि आता आम्हाला हिंदुत्व शिकवणार का?, असा सवालही त्यांनी विचारलाय. संजय राऊत पुढं म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून घंटाधारी बोगस हिंदुत्ववादी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत होते. मुंबईत येऊन मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा वाचू, अशी भाषा त्यांनी वापरली.

अमरावतीच्या बंटी-बबलीनं गोंधळाचा प्रयत्न केला. पंतप्रधानांच्या दौऱ्याचं कारण सांगून त्यांनी पळ काढला, शेपूट घातलं. पंतप्रधानांच्या दौऱ्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे, ते आमचंही पंतप्रधान आहेत. पंतप्रधानाच्या दौऱ्याचं रक्षण करण्यासाठी शिवसैनिक (Shiv Sainik) ठामपणे उभा राहिल. त्यामुळं बंटी-बबलीचा दावा साफ चुकीचा आहे. मला शिवसैनिकांचं आश्चर्य वाटतंय, कौतुकही वाटतंय, की आपात्कालीन परिस्थितीत त्यांच्यासाठी अॅम्ब्युलन्स ठेवली होती. मानवतावादी दृष्टीकोन बघा, मला आनंद वाटला. दरम्यान, यावेळी पत्रकारांनी त्यांना राणांना सुरक्षा का दिली? याबाबत विचारले असता, राऊतांनी याचं कारण खासगीत सांगतो, असं म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT