Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : 'शासन आपल्या दारी अन् आम्ही दिल्ली दरबारी'; राऊतांची शिंदे-फडणवीसांवर खोचक टीका

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाचं खातेवाटप आज पार पडलं. यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये 'कही खुशी कही गम', अशी स्थिती आहे. त्याचं कारण म्हणजे अनेक नेत्यांची मंत्रीपदे ही नवीन मंत्र्यांना देण्यात आली आहे. तसेच मंत्रीमंडळ विस्तार होत नसल्यानेही शिंदे गटातील काही नेते नाराज असल्याचा दावा करण्यात येतोय. यावरून संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे.

मला कोणी तरी सांगितलं की, सरकार नाशिकमध्ये येणार आहे. सरकार आपल्या दारी आणि आम्ही दोघे दिल्लीच्या दरबारी अशी अवस्था सरकारची असल्याचा टोलाही राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

अजित पवार यांचं राजकारणात वजन आहे. त्यांचे आणि आमचे राजकीय मतभेद आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाशी आम्ही सहमत नाही. ज्या पद्धतीने त्यांनी भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, ते महाराष्ट्राला पसंत पडलेलं नाही, असही राऊत म्हणाले.

शेवटी राजकारणात कोण कशी सौदेबाजी करतो, त्याच्यावर मलई वगैरे मिळत असते. वर्षभर इतरांनी मलई खाल्ली. आता त्यांना वाटेकरी आले आहेत. त्यांच्यात स्वाभिमान असेल तर त्यांनी सरकरामध्ये राहता कामा नये, असा टोला राऊत यांनी शिंदे गटाला लगावला. तसेच त्यांची अवस्था फार गंभीर झाली असून सत्तार यांचं मंत्रीपदही जाईल, असा दावा राऊत यांनी केलं.

दरम्यान अजित पवार उत्तम अर्थमंत्री होते. त्यांनी आर्थिक शिस्त आणि आर्थिक घडी बसवण्याचा प्रयत्न केला. वर्षभरात बेफाम उधळपट्टी झाली, त्याला अजित पवार यांच्यामुळे चाप बसेल असंही राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT