sanjay raut sunil raut  
महाराष्ट्र बातम्या

प्रविण राऊतांचं आडनाव राऊत असलं म्हणजे ते आमचे पाहुणे झाले का? सुनील राऊतांचे उत्तर

संजय राऊत यातूनही सहीसलामत बाहेर पडतील असं त्यांचे बंधू सुनील राऊत म्हणाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांचे बंधू आमदार सुनील राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी काही लोकांनी ईडीला घाबरून शिंदे गट गाठला पण संजय राऊत हा शिवसेनेचा निष्ठावंत सैनिक आहे. तो न घाबरता, न जुमानता ईडीच्या कारवाईला सामोरे गेला आहे आणि यातूनही तो सरसलामतपणे बाहेर पडेल असं सुनील राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत ज्या प्रकारे या कारवाईला दबावाला बळी न पडता सामोरे गेले त्यामुळे सर्वांना त्यांचा अभिमान आहे. यामुळेच उद्धव ठाकरे माझ्या आईला आणि कुटुंबियांना भेटले आहेत. सध्या ईडीने ज्या प्रकरणात समन्स दिलं होतं त्यासंदर्भात त्यांची चौकशी चालू असून त्याला उत्तर ते देतील असंही सुनील राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, पत्रा चाळ प्रकरणात प्रविण राऊत यांच्याकडून संजय राऊतांच्या पत्नीच्या अकाऊंटवरून पैसे आल्याचा आरोप होत असून ते राऊत यांचे नातेवाईक आहेत का? या आरोपावर बोलताना सुनील राऊत म्हणाले की, प्रविण राऊतांवर कारवाई झाली पण त्यांचं आडनाव राऊत आहे म्हणून ते काय आमच्या कुटुंबातले झाले का? असा सवाल करत संजय राऊतांना राजकीय सूडबुद्धीने अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ईडीकडे पुरावे नसताना कोणतेही आरोप लावले जात आहेत. हे खरेखुरे आरोप नसून राजकीय आरोप आहेत. भावना गवळींवर सुद्धा आरोप झाले होते पण त्या शिंदे गटात गेल्यावर त्यांची चौकशी बंद झाली. असं का घडतं? हा सगळा भाजपचा खेळ असल्याचाआरोप संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT