Sanjay Raut emotional tweet maharashtra politics 
महाराष्ट्र बातम्या

मनुष्य का हमेशा...संजय राऊतांचे ट्वीट; नरमले की गरजले?

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिवसेनेच्या १२ खासदारांनीही नव्या सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

धनश्री ओतारी

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिवसेनेच्या १२ खासदारांनीही नव्या सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी शिवसेना खासदारांनी संजय राऊत यांच्यामुळेच युतीची चर्चा फिस्कटल्याचा खुलासा केला. यानंतर शिवसेनेचे एकहाती लढवय्ये खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या ट्विटमधून त्यांनी स्वतःलाच आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात संजय राऊतांचे ट्वीट नरमले की गरजले? असा सवाल उपस्थित होत आहे. (Sanjay Raut emotional tweet maharashtra politics)

आमदारांनीही संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन शिवसेनेतील दूरी वाढतच गेल्याचे म्हटले होते. आता, भाजप नेतेही संजय राऊत यांनाच दोष देत आहेत. रावसाहेब दानवे यांनीही संजय राऊतांमुळेच युती तुटल्याचं म्हटले आहे. बंड पुकारलेल्या आमदारांनी शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीला संजय राऊतांना जबाबदार धरले आहे. यासर्वादरम्यान, राऊत यांनी एक ट्विट कले आहे. जे सध्या चर्चेत आले आहे.

मनुष्य का हमेशा डर के माध्यम से ही शोषण किया जाता है ! असे ओशोंच्या विचाराचे ट्विट करत जो डर गया वो मर गया. असे म्हटले आहे.

तर काल त्यांनी 'जब वक्त बुरा चल रहा हो तो लोग..हाथ नही गलतीयां पकडते हैं', असे ट्विट केलं होतं. राऊतांच्या या ट्विटला भाजप नेते मोहित कंबोज यांनी रिप्लायही दिला होता. जसं पेराल तसंच उगवंत, असे ट्विटमध्ये कंबोज यांनी म्हटले होते.

देशासह राज्याचं लक्ष लागून असलेल्या शिंदे ठाकरे वादावर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आमचीच शिवसेना खरी, आमदारांची अपात्रता, पक्षांतर बंदी कारवाई अशा अनेक मुद्द्यांवरुन हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. शिवसेनेच्या अस्तित्वाच्या या प्रश्नाला आता न्यायालयाने लांबणीवर टाकलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jackie Shroff: भिडू ये है बिझनेस! जग्गूदादाच्या बायकोने कसे केले 1 लाखाचे 100 कोटी? जाणून घ्या A टू Z स्टोरी

धोनीचा 'Beast' मोड, ७५ लाखांची गाडी चालवताना दाखवून दिलं आर्मीप्रेम....तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO

५ मिनिटाच्या रस्त्यासाठी अर्धा तास! राज ठाकरेंना अनुभवावं लागलं पुण्याचं ट्रॅफिक... रोज कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांच्या मनस्तापात भर

Car Prices: फक्त काही दिवस थांबा! गाड्या 1.5 लाखांनी स्वस्त होणार? काय आहे कारण?

Ganesh Chaturthi 2025 : भाद्रपद महिना 'या' राशींसाठी घेऊन येणार मोठा ट्विस्ट, बाप्पाच्या येण्याने होणार संकटांचा विनाश

SCROLL FOR NEXT