Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : ''अर्थसंकल्पातून मुंबईला चमचाभर हलवादेखील मिळाला नाही''

ज्या मुंबईतून देशाला सर्वाधिक महसूल मिळतो त्याच महसूलातून कालचं बजेट सादर करण्यात आल्याचे ते म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

Sanjay Raut On Union Budget : आगामी काळात म्हणजेच २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणउका जनतेच्या पैशांवर कशा लढवल्या जातील याचं उत्तम उदाहरण म्हणजे काल सादर झालेला अर्थसंकल्प आहे, असा घाणाघात खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

ज्या मुंबईतून देशाला सर्वाधिक महसूल मिळतो त्याच महसूलातून कालचं बजेट सादर करण्यात आल्याचे ते म्हणाले. मात्र, यात मुंबई आणि महाराष्ट्राला नक्की काय मिळालं असा प्रश्न यावेळी राऊत यांनी उपस्थित केला.

बजेटआधी साऊथ ब्लॉकमध्ये बंद खोलीत हलवा तयार केला जातो. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यासाठी आणि मुंबईसाठी त्यातील चमचाभर हलवादेखील मिळाला नसल्याची टीका राऊत यांनी यावेळी केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून मुंबई आणि औद्योगिक आर्थिकदृष्ट्या अधपतन करण्याचं कारस्थान कालच्या बजेटमध्ये पुन्हा एकदा दिसल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मुंबईत वारंवार येत असून, अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या टोळधाडी येत आहेत. तर, उपमुख्यमंत्री मोठ मोठ्या घोषणा करत आहेत. मात्र, या सर्व घोषणा आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन केल्या जात आहेत.

मोदी एका महिन्यात दोनवेळा मुंबईत येत आहेत. मात्र, येताना ते मुंबईसाठी काय आणतायेत? काय देत आहेत हा एक रहस्यमय विषय असल्याचे राऊत म्हणाले.

मुंबई पालिका जिंकून आणि शिवसेनेची सत्ता घालवून भविष्यात मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करून राज्याचे जर कुणाला समाधान मिळणार असेल तर, असे होणार नाही.

बजेटमध्ये मुंबईच्या अनेक मागण्या होत्या. अनेक खासदारांनी त्या मागण्या केल्या होत्या. मात्र, अर्थसंकल्पात केवळ वाटाण्याच्या अक्षता वाटण्यात आल्या त्यावर आता भाष्य करणं योग्य नाही. मात्र, आम्ही नक्कीच आवाज उठवत राहू असे राऊत म्हणाले.

शेअर मार्केटची सुरूवात आज पडझडीने झाली. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्धस्त करण्याचे काम भाजपने केले आहे.

अदानी समूहातील घोटाळ्यामागे भाजप

अदानी समूहातील घोटाळ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अदानी समूहाने केलेला हा घोटाळा सर्वात मोठा असल्याचे ते म्हणाले. यात सत्ताधारी भाजपचा थेट संबंध आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी यावेळी केला.

अदानी समूहाने केलेल्या घोटाळ्यावर संसदेत आवाज उठवणार असल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात आता बैठक होणार आहे. या बैठकीत रणनीती ठरवली जाणार आहे असे यावेळी राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup: इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने भारताची चिंता वाढली! सेमीफायनलमधील शेवटच्या जागेसाठी न्यूझीलंडशी शर्यत; पाहा समीकरण

INDW vs ENGW: इंग्लंडविरुद्ध सामना कुठे फिरला, ज्यामुळे भारताचा झाला ४ धावांनी पराभव, हरमनप्रीत कौरने बोलून दाखवली मनातलं दु:ख

Sugarcane Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून उसाच्या किमतीत वाढ, आता एका क्विंटलमागे किती रुपये मिळणार?

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT