Sanjay Raut has doubts about the suprim court Sanjay Raut has doubts about the suprim court
महाराष्ट्र बातम्या

न्यायालय रामशास्त्री बाण्याने वागले तर... संजय राऊतांचं वादग्रस्त विधान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्य सरकारच्या बहुमत चाचणीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. याकडे आमचे लक्ष लागून आहे. निर्णय काय येतो माहिती नाही. मात्र, रामशास्त्री बाण्याने न्यायालय वागले तर शिवसेनेचा विजय होईल, असे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. (Sanjay Raut has doubts about the suprim court)

सुप्रीम कोर्टात अद्यापही सुनावणी सुरू आहे. बहुमत चाचणी आणि अपात्र उमेदवारांच्या निर्णयावर दोन्ही पक्षांच्या वकिलांमध्ये चांगलाच युक्तिवाद सुरू आहे. ‘रामशास्त्री बाण्याने न्यायालय वागले तर शिवसेनेचा विजय होईल’ असे म्हणून खासदार संजय राऊत यांनी न्यायालयाच्या वागण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांनी आपल्याच माणसांनी दगा दिल्याचे आज बोलून दाखवले. त्यांच्या मनातील दुःख स्पष्ट दिसत होते. त्यांच्या डोळ्यांत पाणी आले होते. आमच्याच माणसांनी पाठीत खंजीर खुपसल्याने ही वेळ आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

बंडखोर आमदारांनी लोकशाहीची हत्या केली. शिवसेनेची (Shiv Sena) हत्या केली. ही वेदना महाराष्ट्राच्या मनात कायम राहील आणि राहायलाच पाहिजे. त्यांना वर गेल्यावर याचा हिशोब द्यावा लागेल. उद्या जे व्हायचे आहे ते होईल. मात्र, महाराष्ट्राला उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री मिळणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी भाषण केले तेव्हा ते निरोप देत आहेत असे वाटले नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT