Sushma Andhare News
Sushma Andhare News esakal
महाराष्ट्र

Sushma Andhare : सुषमा अंधारे प्रकरणात संजय राऊतांचं विधान, 'आमच्या पक्षात किमान सभ्यता...'

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचं बोललं जात आहे. ज्या बीडच्या जिल्हाप्रमुखाने हे कृत्य केलं त्यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तर सुषमा अंधारे यांनी मात्र असं काहीही झालं नसल्याचं म्हटलं आहे.

राज्यात शिवसेनेची (ठाकरे गट) महाप्रबोधन यात्रा सुरु आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे ह्या यात्रेचं नेतृत्व करत आहे. यात्रेचा समारोप बीड येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी संजय राऊत यांची उपस्थिती राहणार आहे. मात्र समारोपाच्या कार्यक्रमापूर्वीच सुषमा अंधारे यांच्याबाबत एक प्रकार घडला.

शिवसेनेचे बीडचे दुसरे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचं त्यांनी स्वतःच सांगितलं. दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी मात्र आपल्यासोबत असं काहीही झालं नसल्याचं सांगितलं आहे. सुषमा अंधारे ह्या पैसे मागतात, पैशाच्या जोरावर पद वाटप करत आहेत, असा आरोप जाधव यांनी केला आहे.

याप्रकरणी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, महाप्रबोधन यात्रेचं नेतृत्व सुषमा अंधारे ह्या करत आहेत. क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. पक्षप्रमुखांनी तात्काळ कारवाई करुन संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. शिवसेनेत ही किमान सभ्यता पाळली जाते, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT