Sanjay Raut in Arthur road jail Uddhav Thackeray were denied permission to meet Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

संजय राऊतांना भेटण्यास ठाकरेंना परवानगी नाकारली, पण...

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

धनश्री ओतारी

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संजय राऊत सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इच्छुक होते. मात्र, आर्थर रोड कारागृह प्रशासनाने ठाकरेंना परवानगी नाकारली. मात्र, त्यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी हे वृत्ता फेटाळले आहे. (Sanjay Raut in Arthur road jail Uddhav Thackeray were denied permission to meet Sanjay Raut)

ऑर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इच्छुक होते. पण तुरुंग प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. उद्धव ठाकरे यांना भेटीसाठी कोर्टाची परवानगी घेण्याचे निर्देश आर्थर रोड कारागृह प्रशासनाने दिले आहेत.

जेल अधिक्षकांच्या कार्यालयात संजय राऊत यांना भेटायला द्यावं असा निरोप उद्धव ठाकरे यांच्यामार्फत ऑर्थर रोड कार्यालयाला पाठवण्यात आला होता. मात्र यावर ऑर्थर रोड कारागृह प्रशासनाने नकार देत अशी भेट घेता येणार नाही त्यासाठी कोर्टाची परवानगी घेऊन या असा निरोप दिला.

काय आहे प्रकरण?

गोरेगावच्या पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारात शिवसेनेचे खासदार संजय यांना ईडीकडून 1 ऑगस्टला रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. त्यांच्या भांडुपच्या निवासस्थानी तब्बल साडे नऊ आणि त्यानंतर ईडी कार्यालयात आठ तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना अटक झाली होती. सुरूवातीला संजय राऊतांना 4-4 दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली होती. तर 8 ऑगस्टला त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

राऊतांना 08 ऑगस्ट रोजी त्यांची ईडी कोठडी संपली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. ईडीने राऊत यांची आणखी काही दिवस कोठडी मागितली होती. मात्र राऊतांच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. आता त्यांना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीतच ठेवण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Nitesh Rane, Disha Salian case : आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणावर नितेश राणे तोंड सांभाळणार, थेट सांगून टाकलं 'धन्यवाद'...

Pathardi Bribery Case : पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलिस अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT