महाराष्ट्र बातम्या

संजय राऊतांनी दिलं 'PM की शादी'चं आमंत्रण; लेकीची लग्नपत्रिका चर्चेत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीचं लग्न सध्या चर्चेचं कारण ठरलंय. आज संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा डान्स चर्चेत आला आहे, तर दुसरीकडे हेच लग्न आणखी एका कारणासाठी चर्चेस पात्र ठरलंय. संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत हिचा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी लग्न होणार आहे. त्यांचा या विवाहाला अर्थातच मोठे राजकारणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उद्या म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी हा विवाह पार पडणार आहे. मात्र, या विवाहाची आमंत्रण पत्रिका सध्या चर्चेचं कारण ठरलीय. याचं कारण आहे, की ही पत्रिका चक्क 'पीएम'च्या लग्नाचं आमंत्रण देतीय.

हटके लग्नपत्रिकेची जोरदार चर्चा

उद्याच्या लग्न समारंभाआधी संगीत कार्यक्रम, हळदी समारंभ असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे नियोजित वधू आणि वर म्हणजेच पूर्वशी राऊत आणि मल्हार नार्वेकर यांच्या या लग्न समारंभाला अनेक बड्या व्यक्तींना आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यासाठी छापण्यात आलेली ही लग्नपत्रिकाच सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. कारण या पत्रिकेच्या मुखपृष्ठावरील #PMkiShaadi (पीएम की शादी) असा हॅशटॅग टाकण्यात आला आहे.

#PMkiShaadi हॅशटॅग चर्चेत

या लग्न पत्रिकेमध्ये पूर्वशी आणि मल्हार यांचे इंग्रजीत नाव आहे. पूर्वशी (Purvashi) या इंग्रीजी नावातील पी (P) तसेच मल्हार (Mahlar) या नावातील एम (M) या अक्षरांना घेऊन एक खास हॅशटॅग तयार करण्यात आलाय. या दोन्ही नावांच्या आद्यक्षरांना घेऊन लग्नपत्रिकेवर #PMkiShaadi असं छापण्यात आलंय. हा हॅशटॅग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT